4 August Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटना तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आज आपल्या देशांतील हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेते, पार्श्वगायक, गायक, गीतकार, संगीतकार,निर्माता व दिग्दर्शक इत्यादि अनेक भूमिका आपल्या कारकिर्दीत साकारणारे महान कलावंत किशोर कुमार यांचा जन्मदिन. किशोर कुमार यांनी आपल्या मधुर आवाजाने लोकांना भारावून टाकलं होत. आज सुद्धा त्यांची गाणी मोठ्या आवडीने ऐकली जातात. किशोर कुमार यांनी बंगाली, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम, आणि उर्दू यासह अनेक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. त्यांचे मूळ नाव हे आभास कुमार गांगुली होते. परंतु, त्यांनी सिनेमा जगतात आपले नाव बदलून किशोर कुमार अस केलं.
जाणून घ्या ४ ऑगस्ट रोजी येणारे दिनविशेष – 4 August Today Historical Events in Marathi
४ ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 August Historical Event
- इ.स. १६६६ साली नेदरलँड्स (डच) आणि इंग्लंड देशांत झालेल्या समुद्री युद्धात इंग्रज सैन्यांनी विजय मिळविला.
- इ.स. १८७० साली युद्धाच्या वेळी आजारी व जखमी सैनिकांना मदत करण्यासाठी लंडन या देशांत ब्रिटीश रेड क्रॉस सोसायटीची स्थापना करण्यात आली.
- इ.स. १८८६ साली कोलंबिया देशाच्या राज्यघटनेनुसार कोलंबिया चे नाव बदलून अमेरिका करण्यात आले तेव्हा त्यांनी नवीन संविधान स्वीकारले.
- सन १९१४ साली पहिल्या महायुद्धा दरम्यान जर्मनीने बेल्जियम देशाविरुद्ध तर ब्रिटन ने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.
- सन १९३५ साली ब्रिटीश सरकारने गवर्नमेंट ऑफ इंडिया ऐक्ट ला मंजुरी दिली.
- सन १९४७ साली जपान देशांत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
- सन १९५६ साली देशांतील पहिली भाभा अणु संशोधन अणुभट्टी अप्सरा महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्हाच्या तारापूर या ठिकाणी सुरु करण्यात आली.
- सन १९६७ साली तेलंगाना राज्यातील कृष्ण नदीवर बांधण्यात आलेला जगातील सर्वात लांब दगडी नागार्जुन सागर धरणाचे उद्घाटन करण्यात आलं.
- सन २००८ साली भारत सरकारने शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला (एससीआय) नवरत्न दर्जा प्रदान केला.
४ ऑगस्ट या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 4 August Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १५२२ साली मेवाड राजघराण्यातील 12 वे शासक व राजस्थान राज्यातील उदयपुर शहराचे संस्थापक तसचं, महाराणा प्रताप यांचे वडिल राणा उदय सिंह यांचा जन्मदिन.
- इ.स. १८३४ साली प्रसिद्ध ब्रिटीश गणितज्ञ, तर्कशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ जॉन व्हेन(John Venn) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८४५ साली ब्रिटीश कालीन भारतातील कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक सर फिरोजशाह मेरवणजी मेहता यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९४ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी लेखक नारायण सीताराम फडके यांचा जन्मदिन.
- सन १९२९ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट संगीत पार्श्वगायक, अभिनेता, संगीत दिग्दर्शक, गीतकार, लेखक, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आभास कुमार गांगुली उर्फ किशोर कुमार यांचा जन्मदिन.
- सन १९३१ साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू नरेल ताम्हाणे यांचा जन्मदिन.
- सन १९६१ साली अमेरिकेचे पहिले आफ्रिकन-अमेरिकन राष्ट्राध्यक्ष व राजकारणी तसचं, डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य बराक हुसेन ओबामा(Barack Hussein Obama) यांचा जन्मदिन.
४ ऑगस्ट या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 4 August Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १८७५ साली डॅनिश परीकथा लेखक, प्रवासी कादंबरीकार हैंस क्रिश्चियन एंडर्सन(Hans Christian Andersen) यांचे निधन.
- सन १९३७ साली प्रसिद्ध भारतीय इतिहासकार आणि आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ काशीप्रसाद जयस्वाल यांचे निधन.
- सन १९९७ साली जगातील सर्वात जास्त काळ जगलेल्या व्यक्ती जीन काल्मेंट(Jeanne Calment) यांचे निधन.
- सन २००६ साली भारतीय राजकारणी व लेखिका तसचं, ओडिसा राज्याच्या माजी मुख्यमंत्री नंदिनी सत्पथी यांचे निधन.
relevant tag: 4 August Dinvishes, 4 August Historical Event, 4 August Historical Events in Marathi.