31 May Dinvishes
मित्रांनो, आजचा दिवस आपल्या देशांत इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे. आजच्या दिवशी सन १९२१ साली राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचा ध्वज स्वीकृत केला होता. या ध्वजाची रचना आंध्रप्रदेश प्रदेश मधील एक व्यक्तीने केली होती. या ध्वजाचा रंग हा हिराव आणि लाल रंगाच्या पाट्यांनी शोभित केला होता जेणेकरून त्या जणू हिंदू आणि मुस्लीम समुदायांचे प्रतिनिधीत्व करीत आहेत.
तसचं, मित्रांनो आज जागतिक धुम्रपान विरोधी दिन देखील आहे. जगातील धूम्रपान, तंबाखू आदी सारख्या नशिल्या पदार्थाचे सेवन हे जगातील बरेच नागरिक करीत असतात. त्यामुळे जगात कॅन्सर सारक्या मोठ्या रोगाचे प्रमाण वाढले आहे. त्या रोगाला आळा घालण्यासाठी व धूम्रपानाचे प्रमाण कमी करण्यासाठी जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी 31 मे रोजी जगभर साजरा केला जातो.
जाणून घ्या ३१ मे रोजी येणारे दिनविशेष – 31 May Today Historical Events in Marathi
३१ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 31 May Historical Event
- इ.स. १७२७ साली फ्रान्स, ब्रिटन आणि नेदरलँड्स या देशांनी पॅरिस करारावर स्वाक्षरी केल्या.
- इ.स. १७७४ साली ब्रिटीश कालीन भारतात पहिल्या पोस्ट सेवा कार्यलयाची स्थापना करण्यात आली.
- इ.स. १८६७ साली मुंबई इथे प्रार्थना समाजाची स्थापना करण्यात आली.
- सन १९१० साली दक्षिण आफ्रिका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
- सन १९५२ साली भारतात संगीत, नृत्य आणि नाटक क्षेत्रांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलावंतांना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी स्थापना करण्यात आली.
- सन १९९० साली दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन पंतप्रधान नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- सन २०१० साली भारतात मान्यता मिळालेल्या प्रत्येक खासगी शाळेत गरीब मुलांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा कायदा करण्यात आला होता.
३१ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 31 May Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १५७७ साली मुघल शासक बादशाहा जहांगीर यांच्या पत्नी नूरजहाँ यांचा जन्मदिन.
- इ.स. १७२५ साली माळवा या मराठा राज्याच्या महान मराठा शासिका महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिन.
- इ.स. १८४३ साली भारतातील प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी नाटककार बळवंत पांडुरंग किर्लोस्कर उर्फ अण्णासाहेब किर्लोस्कर यांचा जन्मदिन.
- सन १९१० साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी बालसाहित्यिक व लेखक तसचं, बालमित्र मासिकेचे संस्थापक भास्कर रामचंद्र भागवत यांचा जन्मदिन
- सन १९२८ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित माजी भारतीय क्रिकेटपटू पंकज रॉय यांचा जन्मदिन.
- सन १९३८ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र देशपांडे यांचा जन्मदिन.
- सन १९३१ साली नोबल पारितोषिक विजेते अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ जॉन रॉबर्ट श्रीफर यांचा जन्मदिन.
- सन १९६६ साली श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू रोशन सिरीवर्डेन महानामा यांचा जन्मदिन.
३१ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 31 May Death / Punyatithi /Smrutidin
- इ.स. १८७४ साली महाराष्ट्रीयन प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक आणि कुशल धन्वंतरी भाऊ दाजी लाड यांचे निधन.
- सन १९१० साली वैद्यकीय पदवी मिळविणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे निधन.
- सन १९८८ साली प्रसिद्ध भारतीय समाजसुधारक व हिंदी भाषिक लेखक संतराम बी. ए. यांचे निधन.
- सन १९८८ साली भारतीय राष्ट्रीय पक्षाचे राजकारणी व मध्यप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री व लेखक पं. द्वारका प्रसाद मिश्रा यांचे निधन.
- सन १९९४ साली हिंदुस्थानी संगीतातील संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय शास्त्रीय संगीतकार व बनारस घराण्यातील प्रसिद्ध तबला वादक पंडित समता प्रसाद यांचे निधन.
- सन २००३ साली प्रख्यात भारतीय चित्रपट संगीत दिग्दर्शक आणि पार्श्वगायक अनिल कृष्ण बिस्वास यांचे निधन.
- सन २००९ साली केरळ साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय इंग्रजी भाषिक कवी तसचं, भारतातील केरळ राज्यातील मल्याळम भाषिक लेखिका कमला दास यांचे निधन.