30 November Dinvishes
३० नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
३० नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 30 November Today Historical Events in Marathi
३० नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 30 November Historical Event
- सन १७३१ ला चीनच्या बीजिंगला झालेल्या भूकंपात एक लाख लोक मरण पावले होते.
- सन १७५९ ला दिल्लीचा सम्राट आलमगीर द्वितीय च्या मंत्र्याची हत्या झाली होती.
- सन १८७२ ला याच दिवशी जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळल्या गेला होता.
- सन १९३९ ला सोव्हिएत युनियन ने सीमा विवादामुळे फिनलंड वर आक्रमण केले होते.
- सन १९६१ मध्ये सोव्हिएत युनियन ने कुवैत च्या संयुक्त राष्ट्राच्या अर्जाचा विरोध केला होता.
- सन १९६५ ला प्रसिद्ध व्यंगचित्रकार शंकर पिल्लई यांनी दिल्लीला बाहुल्यांच्या संग्रलायाची स्थापना केली होती.
- सन १९९४ ला आजच्या दिवशी सोमालिया च्या जवळ आशि लॉरो नावाचे एक पर्यटक जहाज आग लागून समुद्रात बुडाले होते.
- सन २००० मध्ये अल गोर यांनी पुन्हा मतमोजणीची अपील केली होती.
- सन २००० मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीची कलाकार प्रियांका चोपडा मिस वर्ल्ड बनली होती.
- सन २००२ ला आय सी सी ने झिम्बाब्वे मध्ये न खेळणाऱ्या देशांवर कारवाई होऊ शकते अशी घोषणा केली.
- सन २००४ ला बांगलादेश च्या लोकसभेत महिलांसाठी ४५ टक्के राखीव जागेचे विधायक मंजूर झाले होते.
- सन २००८ मध्ये आतंकवादी हल्या नंतर सरकारने फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ला स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
- सन २०१३ ला पाकिस्तान ने सिक्रेट पाकिस्तान नावाचा माहितीपट दाखविल्यामुळे विश्वविख्यात मिडिया बीबीसी च्या प्रसारणावर स्थगिती आणली होती.
३० नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 30 November Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८३५ मध्ये जगप्रसिद्ध लेखक मार्क ट्वैन यांचा जन्म.
- १८५८ ला जगप्रसिद्ध वैज्ञानिक जगदीशचंद्र बोस यांचा जन्म.
- १८७४ ला युनायटेड किंग्डम चे माझी प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांचा जन्म.
- १९३१ ला भारतीय इतिहासकार रोमिला थापर यांचा जन्म.
- १९३६ ला भारतीय पार्श्वगायक सुधा मल्होत्रा यांचा जन्म.
- १९४४ ला हिंदी लेखिका मैत्रेयि पुष्पा यांचा जन्म.
३० नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 30 November Death / Punyatithi / Smrutidin
- १९०० ला प्रसिध्द लेखक ऑस्कर वाइल्ड यांचा मृत्यू.
- १९०९ ला इंग्रजी आणि बंगाल मध्ये लिखाण करणारे प्रसिध्द लेखक रमेश चन्द्र दत्त यांचे निधन.
- १९१५ मध्ये प्रसिद्ध तेलगु साहित्यकार गुरुजादा अप्पाराव यांचे निधन.
- २००१ मध्ये जगप्रसिद्ध संगीतकार जॉर्ज हॅरिसन याचं निधन.
- २०१० मध्ये स्वदेशी आंदोलन प्रणेते आणि प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते राजीव दीक्षित यांचे निधन.
- २०१२ मध्ये भारताचे माझी प्रधानमंत्री इंदर कुमार गुजराल यांचे निधन.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!
Thank You So Much And Keep Loving Us!