3 April Dinvishes
मित्रानो, आम्ही या लेखाच्या माध्यमातून आपल्याकरिता आजच्या दिनी इतिहासात घडलेल्या ऐतिहासिक घटना, तसचं, आधुनिक शोध, विशेष व्यति जन्मदिन आणि मृत्युदिन आदी घटनांची संपूर्ण माहिती (3 April Today Historical Events in Marathi) देण्याचा प्रयत्न करीत आहोत. स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा लेख खूप महत्वाचा आहे. तरी आपण या लेखाचे आवश्य वाचन करावे.
जाणून घ्या ३ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 3 April Today Historical Events in Marathi
३ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 3 April Historical Event
- इ.स. १७६९ साली झालेल्या मद्रासच्या तहामुळे पहिले इंग्रज-म्हैसूर युद्ध संपुष्टात आले.
- सन १९२२ साली सोवियत कम्युनिस्ट पार्टीतील केंद्रीय समितीच्या महासचिवपदी जोसेफ स्टालिन यांची नियुक्ती करण्यात आली.
- इ.स. १९३३ साली जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एवरेस्ट वरून पहिल्यांदा विमानाचे उड्डाण करण्यात आले.
- सन १९४८ साली ओरिसा राज्यात उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली.
- इ.स. १९७३ साली अमेरिकन अभियंता तसचं, मोटोरोला कंपनीचे संशोधक मार्टिन कूपर यांनी जगातील पहिला मोबाईल कॉल केला.
- सन १९८४ साली विंग कमांडर राकेश शर्मा हे सोयुझ-११ या अंतराळयानातून अंतराळात जाणारे पहिले भारतीय अंतराळयात्री ठरले.
- इ.स. २००० साली संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज आय एन एस आदित्य नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले. इंधन पुरवण्यासाठी या जहाजाचा वापर करण्यात येतो.
- सन २००७ साली दिल्ली येथे १४ व्या सार्क संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
- इ.स. २०१० साली ॲपल कंपनीने आयपॅड या टॅब्लेट संगणकाची पहिली आवृत्ती बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केली.
३ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 3 April Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८८२ साली मराठी कादंबरीकार द्वारकानाथ माधव पितळे उर्फ नाथमाधव यांचा जन्मदिन.
- सन १९०३ साली भारतीय पद्म भूषण पुरस्कार प्राप्त समाजसुधारक, स्वातंत्र्यता संग्राम सेनानी कमलादेवी चट्टोपाध्याय यांचा जन्मदिवस.
- इ.स. १९१४ साली फिल्ड मार्शलच्या पंचतारांकित पदावर पदोन्नती मिळवणारे पहिले भारतीय सैन्य अधिकारी सॅम मानेकशॉ यांचा जन्मदिन.
- सन १९२९ साली पद्मभूषण व साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त हिंदी लेखक, कादंबरीकार, कार्यकर्ते आणि अनुवादक निर्मल वर्मा यांचा जन्मदिन.
- इ.स. १९४२ साली गोदरेज घराण्याचे प्रमुख आणि गोदरेज समूहाचे अध्यक्ष आदि बुजोरजी गोदरेज यांचा जन्मदिन.
- सन १९५५ साली पद्मश्री पुरस्कार प्राप्त भारतीय पार्श्वभूमी व गझल गायक हरिहरन यांचा जन्मदिन.
- इ.स. १९६२ साली भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रांतील प्रसिद्ध अभिनेत्री व संसद सदस्या जयाप्रदा यांचा जन्मदिन.
- सन १९७३ साली पद्मश्री पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध भारतीय नृत्य नृत्यदिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता प्रभुदेवा यांचा जन्मदिन.सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना दोन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
- इ.स. १९८८ साली जननायक जनता पक्षाचे अध्यक्ष व सहसंस्थापक तसचं, हरियाणा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचा जन्मदिन.
३ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 3 April Death / Punyatithi /Smrutidin
- इ.स. १३२५ साली सुन्नी मुस्लिम विद्वान, चिश्ती घराण्यातील सूफी संत सय्यद मुहम्मद निजामुद्दीन औलिया यांचे निधन.
- सन १६८० साली स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचे स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिह्यातील रायगड किल्ल्यावर त्यांचे आजाराने निधन झाले.
- इ.स.१९९८ साली प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार हरकिसन मेहता यांचे निधन.
- सन १९९८ साली ब्रिटीश गणितज्ञ मेरी कार्टराइट यांचे निधन.
- इ.स. २०१७ साली जयपूर घराण्यातील अग्रगण्य भारतीय शास्त्रीय गायीका, शास्त्रीय शैली ख्याल व हलकी शास्त्रीय शैली ठुमरी आणि भजनकार यांचे निधन.