28 September Dinvishes
मित्रांनो, आपल्या इतिहास काळात प्रत्येक दिवशी कुठल्याना कुठल्या प्रकारच्या घटना या घडलेल्या आहेत. त्या घटनेनुसार त्या दिवसाला देखील महत्व प्राप्त होत असते. अश्याच प्रकारे आजच्या दिवशी देखील इतिहास काळात काही महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत त्या घटनांची संपूर्ण माहिती तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन व निधन पावणाऱ्या व्यक्तीन बद्दल माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आज २८ सप्टेंबर आज जागतिक रेबीज दिन. दरवर्षी हा दिवस २८ सप्टेंबर या दिवशी फ्रांस देशाचे प्रसिद्ध रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुईस पास्चर यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा दिन साजरा करण्यात येतो. रेबीज या आजाराच्या लसीचा शोध त्यांनी लावला. शिवाय या आजाराला आळा घालण्यासाठी व त्याबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रामुख्याने हा दिवस साजरा करण्यात येतो.
जाणून घ्या २८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 28 September Today Historical Events in Marathi
२८ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 28 September Historical Event
- इ.स. १८३७ साली अंतिम भारतीय मुघल सम्राट बहादूर शहा द्वितीय दिल्ली येथील सम्राट बनले.
- सन १९५८ साली फ्रांस देशांत संविधान आमलात आणण्यास मंजुरी देण्यात आली.
- सन १९९९ साली महाराष्ट्र सरकारचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना जाहीर करण्यात आला.
- सन २००८ साली स्पेसएक्स कंपनीने बनविलेले फाल्कन 1 हे यान पृथ्वीच्या कक्षेत जाणारे पहिले खासगी-विकसित द्रव-इंधन प्रक्षेपण वाहन बनले.
२८ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 28 September Birthday / Jayanti / Birth Anniversary
- सन १९०७ साली महान भारतीय क्रांतिकारक, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे लोकनायक भगत सिंग यांचा जन्मदिन.
- सन १९०९ साली दादासाहेब फाळके पुरस्कार सन्मानित भारतीय चित्रपट सृष्टीत प्रदीर्घ कारकीर्द मिळविणारे प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता पी. जयराज यांचा जन्मदिन.
- सन १९२९ साली भारतीय गानकोकिळा म्हणून ख्याती मिळविणाऱ्या आणि सर्वोच्च भारतीय नागरी सन्मान भारत रत्न तसचं, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रपट पार्श्वगायिका व संगीत दिग्दर्शिका लता मंगेशकर यांचा जन्मदिन.
- सन १९४७ साली बांगलादेशच्या राजकारणी व बांगलादेशच्या 10 व्या पंतप्रधान शेख हसीना यांचा जन्मदिन.
- सन १९४९ साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी ४०वे सरन्यायाधीश राजेंद्रमल लोढा यांचा जन्मदिन.
- सन १९८२ साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता रणबीर कपूर यांचा जन्मदिन.
- सन १९८२ साली ऑलम्पिक स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळविणारे पहिले भारतीय नेमबाज अभिनव बिंद्रा यांचा जन्मदिन.
२८ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 28 September Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १८३७ साली भारतातील शेवटचे मुघल शासक बादशहा अकबर द्वितीय यांचे निधन.
- इ.स. १८९५ साली फ्रेंच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ लुई पास्चर(Louis Pasteur) यांचे निधन.
- सन १९५३ साली अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ ऍडविन पॉवेल हबल(Edwin Hubble) यांचे निधन.
- सन १९५६ साली अमेरिकन वैमानिक आणि बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विलियम बोईंग(William E. Boeing) यांचे निधन.
- सन १९८९ साली फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष व राजकारणी फर्डिनांड मार्कोस(Ferdinand Marcos) यांचे निधन.
- सन २००४ साली प्रख्यात भारतीय इंग्रजी साहित्यिक लेखक डॉ. मुल्कराज आनंद यांचे निधन.
- सन २०१२ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रपट संकलक माधव एस. शिंदे यांचे निधन.
- सन २०१२ साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्रा यांचे निधन.
- सन २०१५ साली साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी कवी, शैक्षणिक आणि पत्रकार वीरेन डंगवाल यांचे निधन.