28 December Dinvishes
२८ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
२८ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 28 December Today Historical Events in Marathi
२८ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 28 December Historical Event
- १६१२ ला पहिल्यांदा नेपच्यून या ग्रहाला गॅलीलियो यांनी पाहिले आणि आणि त्याला नाव दिले नेपच्यून.
- १८८५ ला भारतामध्ये राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टी ची स्थापना झाली.
- १९२६ ला इंपिरियल एयरवेज ने भारत आणि इग्लंड यांच्या मध्ये पहिली पोस्ट सेवा सुरु केली.
- १९८३ ला भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी वेस्ट इंडीस विरुद्ध ३० वे शतक पूर्ण करून सर डॉन ब्रॅडमन यांचे रेकॉर्ड तोडले.
- १९८४ ला राजीव गांधींच्या नेतृत्वामध्ये कॉंग्रेसने लोकसभेची निवडणूक जिंकली.
- २००० ला भारतीय डाक विभागाने वीरता पुरस्काराच्या सन्मानार्थ पाच पोस्टाचे तिकीटांचा एक सेट ३ रुपयांचे एक सचित्र तिकीट जारी केले.
- २०१३ ला आम आदमी पार्टी ने कॉग्रेस सोबत गठबंधन करून दिल्ली मध्ये सरकार बनविले.
२८ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 28 December Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १९०० ला मराठी पत्रकार लेखक तसेच कादंबरीकार गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म.
- १९२२ ला अमेरिकन कॉमिक्स लेखक स्टॅन ली यांचा जन्म.
- १९३२ ला भारताचे प्रसिद्ध उद्योजक धीरूभाई अंबानी यांचा जन्म.
- १९३७ ला जगप्रसिद्ध भारतीय उद्योजक रतन टाटा यांचा जन्म.
- १९५२ ला देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचा जन्म.
- २००१ ला अंडर-१९ च्या भातीय टीम चे सदस्य यशस्वी जैसवाल चा जन्म.
२८ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 28 December Death / Punyatithi / Smrutidin
- १९७४ ला राजस्थान चे पहिले मुख्यमंत्री हीरा लाल शास्त्री यांचे निधन.
- १९८१ ला भारतीय चित्रपट अभिनेता डेव्हिड अब्राहम चेउलकर यांचे निधन.
- २००२ ला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित अच्युत कानविंडे यांचे निधन
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!