27 February Dinvishesh
२७ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
२७ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 27 February Today Historical Events in Marathi
२७ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 27 February Historical Event
- १८४४ ला केरीबियन देश डोमिनिकन रिपब्लीक ला स्वातंत्र्य मिळाले.
- १८७४ ला आजच्या दिवशी इंग्लंड च्या लॉर्ड क्रिकेट मैदानावर पहिल्यांदा बेसबॉल खेळ खेळला गेला.
- १९०० ला ब्रिटन मध्ये लेबर नावाच्या राजकीय पार्टीची स्थापना करण्यात आली.
- १९५१ ला आजच्या दिवशी अमेरिकेच्या संविधानात २१ वा बदल करण्यात आला, त्यामध्ये कोणतीही व्यक्ती हि ८ वर्ष कालावधी पेक्षा जास्त राष्ट्राध्यक्ष पदावर राहू शकत नाही.
- २००२ ला गुजरात येथील गोधरा रेल्वे स्टेशन वर मुस्लीम जमावाने आग लावल्याने त्यामध्ये ५९ हिंदूचे लोकांचे प्राण गेले आणि त्यादिवशी गुजरात मध्ये वातावरण चिघळले.
२७ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 27 February Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८९९ ला इन्सुलिन चा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञांपैकी चार्ल्स एच बेस्ट यांचा जन्म.
- १९१२ ला प्रसिद्ध मराठी लेखक विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म.
- १९३२ ला अमेरिकन चित्रपट अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचा जन्म.
- १९४३ ला कर्नाटक चे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांचा जन्म.
- १९५२ ला भारतीय चित्रपट निर्माता प्रकाश झा यांचा जन्म.
- १९७१ ला भारतीय उद्योजक निरव मोदी यांचा जन्म.
- १९८६ ला भारतीय हॉकी टीम चे माजी कर्णधार संदीप सिंह यांचा जन्म.
२७ फेब्रुवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 27 February Death / Punyatithi / Smrutidin
- १७१२ ला आजच्या दिवशी सातवा मुघल सम्राट बहादुरशाह पहिला चे निधन.
- १९३१ ला भारताचे स्वातंत्र्य सैनिक चंद्रशेखर आझाद यांचे निधन.
- १९५६ ला लोकसभेचे पहिले स्पीकर गणेश वासुदेव मावळणकर यांचे निधन.
- १९७६ ला कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री के. सी. रेड्डी यांचे निधन.
- १९९७ ला प्रसिद्ध गीतकार श्यामलाल बाबू राय यांचे निधन.
- २०१० ला भारतरत्न नानाजी देशमुख यांचे निधन.
- २०१२ ला माजी भारतीय फुटबॉलर सैलेंद्र नाथ मन्ना यांचे निधन.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!