26 November Dinvishes
२६ नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
२६ नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 November Today Historical Events in Marathi
२६ नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 November Historical Event
- आजच्या दिवशी श्वेत क्रांतीचे जनक मानल्या जाणारे डॉ.वर्गीस कुरियन यांचा १९२१ मध्ये जन्म.
- इतिहासात आजच्या दिवशी १९४९ मध्ये आपल्या देशाच्या सर्वोच्चपदी असणाऱ्या संविधानाला स्वीकृती मिळाली होती.
- स्वतंत्र भारताच्या संविधानावर आजच्या दिवशी १९४९ मध्ये संविधान सभेच्या अध्यक्षांनी स्वाक्षरी केली होती.
- भारतात सर्वप्रथम कानपूर आणि लखनो या दोन शहरांत आजच्या दिवशी १९६० मध्ये STD सेवा सुरु झाली होती.
- १९६७ मध्ये लिस्बन शहरात ढगफुटी झाल्यामुळे ४५० लोकांना जीव गमवावा लागला होता.
- इराक आणि अमेरिका ने १९८४ मध्ये राजनीतिक संबंध पुनर्स्थापित केले होते.
- १९९० मध्ये ब्रिटनची माजी प्रधानमंत्री मार्गारेट थॅचर यांनी त्यांचा राजीनामा ब्रिटन च्या राणीला सोपवला होता.
- १९९२ मध्ये ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना त्यांच्या संपत्ती वर कर द्यावा लागेल हा नवीन निर्णय त्यांच्या संसद मध्ये घेण्यात आला होता.
- १९९७ मध्ये पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टच्या दोन न्यायाधीशांनी मुख्य न्यायाधीशाला निलंबित केले होते.
- २००२ मध्ये बीबीसी च्या सर्वेक्षणाने विस्टन चर्चिल यांना महान ब्रिटीश नागरिक म्हणून निवडल्या गेले होते.
- २००६ ला इराक़ मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटामध्ये २०२ लोक मृत्युमुखी पडले होते.
- मुंबई मध्ये २००८ ला दहशदवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता, त्यांनी मुंबई च्या ताज हॉटेल मध्ये घुसून अनेक लोकांना बंधक बनवले होते, पण त्यावर देशाच्या जवानांनी आणि पोलिसांनी चोख प्रतिउत्तर देत तीन दिवसात बंधकांना मोकळे केले होते.
- २००८ मध्ये मुंबईला झालेल्या दहशदवादी हल्यात १६४ लोक मारले गेले होते आणि २५० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले होते.
- २०१२ ला सिरीया मध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात १० मुले मृत्युमुखी पडले होते आणि १५ गंभीर जखमी झाले होते.
२६ नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 26 November Birthday / Jayanti / Birth Anniversary
- प्रसिध्द लेखक, प्रकाशक, कवी, संपादक आणि भाषाशास्त्रज्ञ नाथुराम प्रेमी यांचा जन्म १९८१ मध्ये जन्म.
- भारताचे प्रसिद्ध इतिहासकार शिक्षविद राम शरण शर्मा यांचा १९१९ मध्ये जन्म.
- श्वेत क्रांतीचे जनक मानल्या जाणारे डॉ.वर्गीस कुरियन यांचा १९२१ मध्ये जन्म.
- अमेरिकेतील प्रसिद्ध व्यंगचित्रकार चार्ल्स एम. शुल्झ यांचा १९२२ मध्ये जन्म.
- भारताचे प्रसिद्ध छायाचित्रकार वी.के.मूर्ती यांचा १९२३ मध्ये जन्म.
- महान शास्त्रज्ञ आणि शिक्षक यशपाल यांचा १९२६ मध्ये जन्म.
- भारताचे प्रसिद्ध राजनितीकार आणि पूर्व लोकसभा अध्यक्ष रवी राय यांचा १९२६ मध्ये जन्म.
- भारतीय चित्रपट सृष्टीतील नामांकित कलाकार अर्जुन रामपाल यांचा १९७२ मध्ये जन्म.
२६ नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 26 November Death / Punyatithi / Smrutidin
- भारताचे राजनीतीतज्ञ तसेच हिंदी साहित्यामध्ये आपली छवी निर्माण केलेले शंकर दयाल सिंग यांचे १९३७ मध्ये आजच्याच दिवशी निधन झाले होते.
- १९८२ च्या आयपीएस बॅच चे अधिकारी २००८ मध्ये मुंबई येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यात शहीद झाले होते.
- एन्कौन्टर स्पेशलीस्ट विजय सालस्कर २००८ मध्ये मुंबई येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यात शहीद झाले होते.
- २००४ मध्ये याच दिवशी भारताचे इतिहासकार तपन राय चौधरी यांचे निधन झाले होते.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत.आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.