26 March Dinvishesh
आज आपण या लेखांत आजच्या दिनी घडलेल्या सर्वच घटनांची माहिती इथे पाहणार आहोत. इतिहासात तसेच आधुनिक काळात अनेक घटना घडून गेलेल्या आहेत त्यापैकी काहीच गोष्टींची माहिती आपणास माहिती असते. अश्याच काही घटनांची माहिती (26 March Today Historical Events in Marathi) आपण या लेखाद्वारे करून घेणार आहोत.
जाणून घ्या २६ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 26 March Today Historical Events in Marathi
२६ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 26 March Historical Event
- इ.स. १५५२ साली ७३ वर्षीय गुरु अमरदास शीख धर्माचे तिसरे गुरु बनले.
- सन १६६८ साली इंग्रजांनी इस्ट इंडिया कंपनीच्या मध्यमातून मुंबई प्रांतावर आपले अधिकार प्राप्त केले होते.
- इ.स. १७८० साली ब्रिटीश वर्तमानपत्र ब्रीट गैजेट आणि संडे मॉनीटर यांचे प्रकाशण सर्वप्रथम रविवारच्या दिवशी करण्यात आले.
- सन १९०२ साली नेमस्त पक्षाचे अध्वर्यू नामदार गोपाल कृष्ण गोखले यांनी मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण केले.
- इ.स. १९१० साली लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध संस्थानातील कुंडलच्या माळावर कारखाना उभारण्यास सुरवात केली.
- सन १९४२ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या नेत्या इंदिरा गांधी यांचा विवाह फिरोज गांधी यांच्या सोबत आनंद भवन येथे पार पडला.
- इ.स. १९७१ साली पाकिस्तान देशातून बांगलादेशाची विभागणी करण्यात आली आणि बांगलादेश स्वातंत्र्य राष्ट्र घोषित करण्यात आलं
- सन १९७२ साली भारताचे माजी राष्ट्रपती वी. वी. गिरी यांनी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पहिल्या आंतरराष्ट्रीय संस्कृत परिषदेचे उद्घाटन केले.
- इ.स. १९७३ साली लंडन स्टॉक एक्सचेंज ने २०० वर्ष जुने ऐतिहासिक नियम मोडीत काढत महिलांना पहिल्यांदाच नोकरीवर रुजू करून घेतले.
- सन १९७४ साली झाडांची कत्तल थांबविण्यासाठी गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्वात चिपको आंदोलन सुरु करण्यात आले.
- इ.स. २००० साली रशियाच्या अध्यक्षपदी ब्लादिमीर पुतीन यांची निवड करण्यात आली.
२६ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 26 March Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८७४ साली अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा जन्मदिन.
- सन १८७५ साली दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्रपती सिंगमन री यांचा जन्मदिन.
- इ.स. १८७९ साली स्विस-अमेरिकन सिव्हिल इंजिनियर ओथमार हमेन अम्मान यांचा जन्मदिन. त्यांनी डिझाईन केलेल्या ब्रिज डिझाईन्समध्ये जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज, वेर्राझानो-नारोज ब्रिज आणि बायोन ब्रिज यांचा समावेश आहे.
- सन १८९८ साली जर्मन स्पोर्ट्सवेअर कंपनी पुमा व अॅडिडासचे संस्थापक रुडॉल्फ “रुडी” डसलर यांचा जन्मदिन.
- इ.स. १९०७ भारतीय हिंदी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक व शिक्षणतज्ञ महादेवी वर्मा यांचा जन्मदिन.
- सन १९०९ साली भारतीय इतिहासकार, स्वातंत्र्यसैनिक, प्रकाशक आणि गोवा राज्याचे पत्रकार बी. डी. सातोसकर यांचा जन्मदिन
- इ.स. १९१९ साली भारतीय राजकारणी, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि दिग्गज कॉंग्रेसचे नेते तासेच विधानसभेचे माजी सभासद व माजी कॅबिनेट मंत्री भिकाजीराव जिजाबा खताल- पाटील यांचा जन्मदिन.
- सन १९२९ साली शीख धार्मिक नेत्यांच्या संत मतवादी वंशाचे आध्यात्मिक शिक्षक ठाकर सिंह यांचा जन्मदिन.
- इ.स. १९३३ साली हिंदी साहित्य व संस्कृतीचे लेखक आणि अभ्यासक कुबेर नाथ रे यांचा जन्मदिन.
- सन १९७३ साली अमेरिकन वैज्ञानिक आणि इंटरनेट उद्योजक तसेच, गुगलचे सह संस्थापक लॉरेन्स एडवर्ड पेज यांचा जन्मदिन.
- इ.स. १९८७ साली भारतीय फुटबॉल खेळाडू रॉविल्सन रॉड्रिग्ज यांचा जन्मदिन.
२६ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 26 March Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १८२७ साली जर्मन कर्णबधिर संगीतकार व पियानो वादक लुडविग व्हॅन बीथोव्हेन यांचे निधन.
- सन१९३२ साली अमेरिकन मशीनीस्ट, संशोधक, अभियंता आणि ऑटोमोटिव्ह उद्योजक तसेच, प्रीमियर अमेरिकन लक्झरी ऑटोमोटिव्ह मार्क्स कॅडिलॅक आणि लिंकनचे संस्थापक हेनरी मार्टिन लेलँड यांचे निधन.
- सन १९३८ साली भारतीय कवी, कादंबरीकार आणि आधुनिक आसामी साहित्याचे नाटककार लक्ष्मीनाथ बेजबरोआ यांचे निधन.
- इ.स. १९९६ साली भारतीय चित्रकार के.के हेब्बर यांचे निधन.
- सन १९९७ साली भारतीय गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक व उद्योगपती नवकमल फिरोदिया यांचे निधन.
- इ.स. १९९८ साली भारतीय आधुनिक कन्नड भाषिक साहित्यिक डॉ. शांतीनाथ देसाई यांचे निधन.
- सन १९९९ साली बंगाली भाषिक गायक व संगीतकार आनंद शंकर यांचे निधन.
- इ.स. २००३ साली अमेरिकन राजकारणी, समाजशास्त्रज्ञ आणि मुत्सद्दी तसेच अमेरिकन सिनेटर, भारतातील अमिरीकेचे राजदूत आणि अमिरीकेच्या सिनेटमध्ये भारताची बाजू मांडणारे नेता डॅनियल पेट्रिक “पॅट” मोयनिहान यांचे निधन.
- सन २००३ साली गुजरातचे गृहमंत्री हरेन पंड्या यांची हत्या करण्यात आली.
- इ.स. २००८ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक व दलित साहित्यिक बाबुराव बागूल यांचे निधन.
- सन २००६ साली भारतीय राजकारणी व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पश्चिम बंगाल राज्य समितीचे सचिव अनिल विश्वास यांचे निधन.
- इ.स. २०१२ साली महाराष्ट्रीयन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, मराठी भाषिक कवी माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांचे निधन.
वरील संपूर्ण माहिती आपणास ऐतिहासिक तसेच आधुनिक घटनांची ओळख करून देते. आपल्यासाठी आम्ही आजच्या दिनी घडलेल्या सर्वच घटनांची माहिती मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी आपण आमच्या लेखांचे नियमित वाचन करून आपले ज्ञान वाढवा.
धन्यवाद..