24 December Dinvishes
२४ डिसेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष.
२४ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 24 December Today Historical Events in Marathi
२४ डिसेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 24 December Historical Event
- १८९४ ला पहिली वैद्यकीय परिषद कोलकत्ता येथे सुरु झाली.
- १९८६ ला दिल्ली येथील लोटस टेंपल भक्तांसाठी उघडण्यात आले होते.
- १९८६ ला भारतीय संसद मध्ये ग्राहक संरक्षण कायदा पारित केल्या गेला. म्हणून २४ डिसेंबर ला ग्राहक दिवस म्हणून साजरा करतात.
- १९८९ ला मुंबई मध्ये देशातील पहिले मनोरंजन पार्क ‘एस्सेल वर्ल्ड’ उघडल्या गेले.
- २००० ला भारतीय बुद्धीबळ खेळाडू विश्वनाथ आनंद यांनी बुद्धिबळातील वर्ल्ड चैंपियनशिप आपल्या नावावर केली.
- २००२ ला दिल्लीच्या मेट्रोचा शुभारंभ झाला.
- २०१४ ला अटल बिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली.
२४ डिसेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 24 December Birthday / Jayanti / Birth Anniversary
- १८९२ ला भारताचे प्रसिद्ध लेखक बनारसीदास चतुर्वेदी यांचा जन्म.
- १८९९ ला पांडुरंग सदाशिव साने (साने गुरुजी) यांचा जन्म.
- १९२४ ला भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांचा जन्म.
- १९३० ला देशातील प्रसिद्ध लेखिका उषा प्रियंवदा यांचा जन्म.
- १९५६ ला भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांचा जन्म.
- १९५७ ला भारतीय चित्रपट सृष्टीची अभिनेत्री प्रीति सप्रू यांचा जन्म.
- १९८८ ला भारतीय क्रिकेट खेळाडू पियुष चावला यांचा जन्म.
२४ डिसेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 24 December Death / Punyatithi / Smrutidin
- १५२४ ला पहिला पोर्तुगीज वास्को द गामा ज्यांनी भारतात येण्याचा पहिला समुद्र मार्ग शोधला त्यांचे निधन.
- १९८७ ला तामिळनाडू चे माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचे निधन.
- १९८८ ला प्रसिद्ध लेखक जैनेंद्रकुमार यांचे निधन.
२४ डिसेंबर ला साजरे केले जाणारे महत्वपूर्ण दिवस.
- राष्ट्रीय उपभोक्ता दिवस.
आशा करतो आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवडले असणार आपल्याला लिहिलेले हे दिनविशेष आवल्यास या लेखाला आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका, सोबतच अश्याच नवनवीन लेखांसाठी जुळलेले रहा माझी मराठी सोबत. आपला अमुल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.
Thank You So Much And Keep Loving Us!