22 May Dinvishes
मित्रांनो, आज जागतिक जैवविविधता दिन. संयुक्त राष्ट्राने जाहीर केल्यानुसार सन २००० सालापासून दरवर्षी २२ मे या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. आपल्या पृथ्वीवर निरनिराळ्या परकारचे सजीव अस्तित्वात आहेत. मग त्यात कीटक, पशू पक्षी आणि वनस्पती या सर्वांची गणती ही सजीवा म्हणून केली जाते. आपल्या निसर्गात अनेक प्रकारच्या प्रजाती उपलब्ध आहेत. त्यापैकी काहीच प्रजातींची नोंद केल्या गेली आहे. या सजीवांची माहिती सर्वांपर्यंत पोहचावी या करिता त्यांचे संवर्धन करणे खूप महत्वाचे आहे. या गोष्टींचे महत्व संपूर्ण लोकांना समजावे याकरता २२ मे या दिवशी जागतिक जैवविविधता दिन साजरा करण्यात येतो.
तसचं, आजच्या दिवशी भारताच्या युवा गिर्यारोहक बचेंद्री पाल यांनी जगातील सर्वात उंच पर्वत शिखर माउंट एवरेस्ट सर करून आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगात उंचावल होत. त्यांच्या या विशाल कामगिरीसाठी त्यांना केंद्रसरकारने पद्मभूषण पुरस्कारने सन्मानित केलं होत.आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास काळात घडलेली काही ऐतिहासिक माहिती, तसचं काही महत्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिन, निधन, त्यांचे शोधकर्य आदी संपूर्ण घटनांची माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या २२ मे रोजी येणारे दिनविशेष – 22 May Today Historical Events in Marathi
२२ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 22 May Historical Event
- इ.स. १५४५ साली दिल्ली येथील मुघल सत्ता प्रथम संपुष्ठात आणून त्याठिकाणी आपल्या सूर साम्राज्याची स्थापना करणारे महान सूर शासक शेर शहा सुरी यांचे निधन.
- सन १९१५ साली प्रथम विश्व युद्धादरम्यान सोवियत राष्ट्र इटलीने मित्र राष्ट्र ऑस्ट्रिया, हंगेरी आणि जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले.
- सन १९८९ साली भारतीय लष्करी दलाने उडीसा राज्यातील मंदिपूर या ठिकाणी स्वदेश निर्मित ‘अग्नी’ या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वीपणे चाचणी केली.
- सन १९०६ साली अथेन्स या देशांत ऑलम्पिक खेळाच्या तिसऱ्या सत्रास सुरवात करण्यात आली. परंतु, काही काळानंतर या खेळाची अधिकृत खेळ म्हणून मान्यता काढून टाकण्यात आली.
- सन १९६१ साली भारतात पुरातन काळापासून चालत आलेल्या हुंडा पद्धतीला आळा घालण्यासाठी राष्ट्रपतींकडे सोपविण्यात आलेल्या हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींनी संमती देताच देशांत हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला.
- सन २००४ साली भारताचे भूतपूर्व पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी आपल्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली.
२२ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 22 May Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १६८८ साली अठराव्या शतकाच्या प्रारंभीचे प्रमुख इंग्रजी कवी अलेक्झांडर पोप यांचा जन्मदिन.
- इ.स. १७७२ साली ब्रह्म सभेचे संस्थापक, ब्राह्मो समाजाचे अग्रदूत व भारतीय उपखंडातील सामाजिक-धार्मिक सुधारणा चळवळीचे कार्यकर्ता तसचं, भारतातील सतीच्या चाल कायदेशीरपणे बंद करणारे थोर महापुरुष राजा राजमोहन रॉय यांचा जन्मदिन.
- इ.स. १८७१ साली प्राचीन संस्कृत ग्रंथांचे मराठीत भाष्य करणारे महाराष्ट्रीयन मराठी भाष्यकार व तत्ववेत्ता विष्णू वामन बापट यांचा जन्मदिन.
- सन १९२५ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय कवी, व रशियन भाषेचे हिंदीत भाष्यांतर करणारे भारतीय भाष्यकार मदन लाल मधु यांचा जन्मदिन.
- सन १९४० साली माजी भारतीय क्रिकेटपटू इरापल्ली अनंतराव श्रीनिवास यांचा जन्मदिन.
- सन १९५९ साली जम्मू काश्मीर राज्याच्या माजी मुख्यमंत्री व जम्मू काश्मीर येथील पीडीपी पक्षाच्या नेता मेहबूबा मुफ्ती यांचा जन्मदिन.
- सन १९८४ साली फेसबुक या सोशल साईटचे सहसंस्थापक इस्टीन मॉस्कोवित्झ यांचा जन्मदिन.
- सन १९८७ साली सर्बिया देशाचे महान टेनिसपटू नोव्हान जोकोव्हीच यांचा जन्मदिन.
२२ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 22 May Death / Punyatithi /Smrutidin
- इ.स. १५४५ साली भारतातील सुरी साम्राज्याचे संस्थापक व महान योद्धा शेरशहा सुरी यांचे निधन
- इ.स. १८०२ साली अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या पत्नी व अमेरिकेतील पहिला महिला म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मार्था वॉशिंग्टन यांचे निधन.
- सन १९९१ साली भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीपाद अमृत डांगे यांचे निधन.
- सन १९९८ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी भाषिक लेखक व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृत मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ.मधुकर आष्टीकर यांचे निधन.
- सन २००३ साली सुप्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन हृदयरोगतज्ञ वर्णन नित्यानंद मांडके यांचे निधन.
- सन २०११ साली वैदिक व बौद्ध काळातील सुप्रसिद्ध भारतीय इतिहासकार तसचं, अलाहाबाद विद्यापीठातील प्राचीन इतिहासाचे प्राध्यापक व कुलगुरू गोविंदचंद्र पांडे यांचे निधन.