22 July Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यामतून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे कार्य यासंबंधी संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आजचा दिवस हा भारताच्या इतिहास घडलेल्या एक महत्वपूर्ण घटनेचा साक्षीदार आहे. आजच्या दिवसाचे महत्व सांगायचे म्हणजे आजच्या दिवशी स्वातंत्र्य प्राप्ती नंतर भारत देशाने आपल्या देशाचे स्वतंत्र राष्ट्रध्वज बनवून घेतला होता. परंतु त्याचा भारताच्या संविधनाने पूर्णपणे स्वीकार केला नव्हता. सन २२ जुलै १९४७ साली त्या राष्ट्रध्वजाला पूर्णपणे मान्यता मिळवून त्याला भारतीय संविधनाने पूर्णपणे अंगिकारले. भारताच्या इतिहास काळात घडलेली ही खूप मोठी गोष्ट आहे. प्रत्येक स्वतंत्र राष्ट्रांचा आपला एक राष्ट्रध्वज हा असतो.
जाणून घ्या २२ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 22 July Today Historical Events in Marathi
२२ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 22 July Historical Event
- सन १९०८ साली भारताचे जहाल मतवादी क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांनी देशाचे दुर्दैव या जहाल मतवादी अग्रलेखाचे लिखाण केल्याप्रकरणी टिळकांना सहा वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली.
- सन १९४४ साली पोलंड देशांत कम्युनिस्ट राजवटीची सुरुवात झाली.
- सन १९४७ साली भारतीय राष्ट्रध्वजाचा अंगीकार करण्यात आला.
- सन १९९९ साली आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने समान कामांसाठी समान वेतन ही योजना लागू केली.
- सन २००३ साली अमेरिकेच्या लष्करी सैन्याने इराकवर केलेल्या बॉम्ब हल्ल्यात इराक शासक सद्दाम हुसेन यांची मुले मारली गेली.
- सन २०१२ साली भारताच्या राष्ट्रपती पदावर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकरणी, प्रणव मुखर्जी यांची नियुक्ती करण्यात आली.
२२ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 22 July Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८९४ साली भारतातील पहिल्या लोकसभेचे सदस्य सरदार तेज सिंह अकरपुरी यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९८ साली भारतीय शास्त्रीय संगीताच्या ग्वाल्हेर घराण्यातील गायक पंडित विनायक नारायण पटवर्धन यांचा जन्मदिन.
- सन १९२३ साली भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय व प्रशंसित पार्श्वगायक मुकेश चंद माथुर उर्फ मुकेश यांचा जन्मदिन.
- सन १९२५ साली भारत सरकारचा लोकमान्य टिळक पुरस्कर सन्मानित महाराष्ट्रीयन प्रतिष्ठित पत्रकार, इंग्रजी वृत्तपत्र महाराष्ट्र टाईम्सचे दिग्गज संपादक, इतिहासकार, अभ्यासक, समाजसुधारक व लेखक गोविंद श्रीपाद तळवलकर यांचा जन्मदिन.
- सन १९३७ साली माजी भारतीय क्रिकेटपटू गोलंदाज वसंत बाबुराव रंजणे यांचा जन्मदिन.
- सन १९६५ साली रॅमन मॅग्सेसे पुरस्कार सन्मानित भारतीय सामाजिक कार्यकर्ते व आशा संस्थेचे एक संस्थापक व सदस्य संदीप पांडे यांचा जन्मदिन.
- सन १९७० साली महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विधानसभा विरोधीपक्ष नेता भारतीय जनता पक्षाचे सदस्य देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिन.
२२ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 22 July Death / Punyatithi / Smrutidin
- सन १९१८ साली माजी भारतीय वायुसेना वैमानिक इंद्र्लाल रॉय यांचे निधन.
- सन १९४८ साली स्वातंत्र्य पूर्व भारतातील प्रसिद्ध भारतीय चित्रकार हेमेंद्रनाथ मजूमदार यांचे निधन.
- सन १९८४ साली उत्कृष्ट मराठी कथा लेखक, साहित्यिक व प्रकाशक गजानन लक्ष्मण उर्फ ग.ल. ठोकळ यांचे निधन.
- सन १९८७ साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू ए. जी. क्रिपाल सिंह यांचे निधन.
- सन १९९५ साली इंग्लंड देशातील माजी व्यावसायिक क्रिकेटपटू हॅरोल्ड लॅरवूड (Harold Larwood) यांचे निधन.
- सन २००३ साली इराक राष्ट्राचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा मोठा मुलगा व त्यांचा उत्तराधिकारी उदय हुसेन यांचे निधन.
- सन २००३ साली इराक राष्ट्राचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा दुसरा मुलगा व इराकी राजकारणी कुसे सद्दाम हुसेन यांचे निधन.