22 April Today Historical Events in Marathi
मित्रानो, आजचा दिवस हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पृथ्वीवर राहणाऱ्या सर्व सजीव सुष्टीला वाचवण्यासाठी तथा संपूर्ण जगात पर्यावरण संरक्षणाची जागरुकता लोकांमध्ये निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो. याची सुरुवात सन १९७० साली करण्यात आली सुमारे १९२ देशाने याला पाठींबा दर्शविला होता आणि आता संपूर्ण जगात २२ एप्रिल हा दिवस जागतिक पृथ्वी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
तसचं, आज स्वातंत्र्यपूर्व भारतात केल्या गेलेल्या विविध सुधारणेचे जनक लॉर्ड डलहौसी यांचा जन्मदिन. याव्यतिरिक्त आपण आणखी काही माहिती (22 April Today Historical Events in Marathi) या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या २२ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 22 April Today Historical Events in Marathi
२२ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 22 April Historical Event
- इ.स. १५०० साली पोर्तुगाल नाविक पेड्रो अल्वेयेर कैब्राल यांनी ब्राझील देशाचा शोध लावला.
- सन १९१५ साली पहिल्या विश्वयुद्धा दरम्यान जर्मन सेनांनी पहिल्याचा विषारी वायूचा वापर केला.
- इ.स. १९२१ साली नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी प्रशासकीय सेवेतून आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- सन १९७० साली सर्वप्रथम जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला.
- इ.स. १९७७ साली टेलीफोन वाहतूक सुरु करण्यासाठी प्रथम ऑफटीकल्स फायबरचा वापर करण्यात आला.
- सन १९७९ साली भूदान चळवळीचे जनक, समाजसुधारक व क्रांतिकारक आचर्य विनोबा भावे यांनी संपूर्ण गोहत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले.
- इ.स. १९९७ साली भारतीय राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रांतील ‘ओमप्रकाश भसीन पुरस्कार’ जाहीर करण्यात आला.
- सन २००६ साली भाजपा नेते प्रमोद महाजन यांचे बंधू प्रवीण महाजन यांनी त्यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळीबार केला.
२२ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 22 April Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १७२४ साली जर्मन तत्ववेत्ता इमॅन्युएल कॅन्ट यांचा जन्मदिन.
- सन १७६० साली मुघल शासक शाहाआलम यांचे द्वितीय पुत्र व भारतातील शेवटचे मुघल शासक बहादूर शहा द्वितीय यांचा जन्मदिन.
- इ.स. १८१२ साली स्वातंत्र्यपूर्व भारताचे गव्हर्नर जनरल लॉर्ड जेम्स अॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे तथा डलहौसी यांचा जन्मदिन.
- सन १८७० साली रशियन क्रांतिकारक, राजकारणी आणि राजकीय सिद्धांतवादी तसचं सोवियत युनियन माजी प्रमुख व्लादिमिर इलिच उलियानोव्ह यांचा जन्मदिन.
- इ.स. १९०४ साली अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ व अणुबॉम्बचे जनक जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांचे निधन.
- सन १९१६ साली बंगाली चित्रपट चित्रपटसृष्टीतील पहिल्या सुप्रसिद्ध नायिका व गायिका कानन देवी यांचा जन्मदिन.
- इ.स. १९१६ साली सुप्रसिद्ध अमेरिकन व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक यहुदी मेन्युहीन यांचा जन्मदिन.
- सन १९२९ साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय भाषासावैज्ञानिक आणि साहित्य समिक्षक तसचं, मराठी अभ्यास परिषदेचे माजी अध्यक्ष व ‘भाषा आणि जीवन’ या मुखपत्राचे प्रमुख संपादक डॉ. अशोक रामचंद्र केळकर यांचा जन्मदिन.
- इ.स. १९२९ साली सुप्रसिद्ध भारतीय मराठी व हिंदी चित्रपट अभिनेत्या तसचं ‘उष:काल’ आत्मचरित्राच्या लेखिका उषाकिरण यांचा जन्मदिन.
- सन १९७४ साली प्रख्यात इंग्रजी कादंबरीकार व लेखक चेतन भगत यांचा जन्मदिन.
२२ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 22 April Death / Punyatithi / Smrutidin
- सन १९१६ साली भारतीय पंजाबी भाषेचे नाटककार, नाट्य दिग्दर्शक, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक व शिक्षणतज्ञ बलवंत गार्गी यांचे निधन.
- इ.स. १९३३ साली इंग्रजी अभियंता व रोल्स रॉयस या कंपनीचे संस्थापक सर फ्रेडरिक हेनरी रॉयस यांचे निधन.
- सन १९८० साली भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी आणि गदर पक्षाचे संस्थापक बाबू मंगू राम चौधरी यांचे निधन.
- इ.स. १९९४ साली अमेरिकन राजकारणी व माजी वकील तसचं अमेरिकेचे माजी (३७ वे) राष्ट्राध्यक्ष रिचर्ड मिलहोस निक्सन यांचे निधन
- सन १९९४ साली थोर विचारवंत व समाजसुधारक जैन मुनी आचार्य सुशीलमुनी महाराज यांचे निधन
- इ.स. २०१३ साली भारतीय सर्वोत्कृष्ट व्हायोलिन वादक लालगुडी जयरमण यांचे निधन.