20 May Dinvishes
मित्रांनो, आज जहालमत वादी विचार सारणी असणाऱ्या लाल बाल पाल यांच्यापैकी एक बिपिनचंद्र पाल यांची आज पुण्यतिथी आहे. बिपिनचंद्र पाल हे लोकमान्य टिळक आणि लाला लजपतराय यांचे निकटवर्तीय होते. त्यांची स्वराज्याबद्दल अशी धारणा होती की, ब्रिटीश सरकारला विनंती करून ते आपल्याला सहजपणे स्वातंत्र्य देणार नाहीत. त्यासाठी आपण सर्वांनी मिळुन लढा द्यायला पाहिजे इंग्रजांना जशास तसे उत्तर दिले पाहिजे.
ते बंगाल प्रांतातील एक थोर भारतीय क्रांतिकारक होते. देशासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या महान क्रांतीकारकाला माझी मराठीच्या संपूर्ण टीम कडून शतशः नमन. तसेच, आज आपण या लेखाच्या मध्यमातून आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या २० मे रोजी येणारे दिनविशेष – 20 May Today Historical Events in Marathi
२० मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 20 May Historical Event
- इ.स. १४९८ साली पोर्तुगीज खलासी वास्को दी गामा दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिणेकडील भागाला वळसा घालून भारताच्या समुद्र किनारी भागातील कालिकत या ठिकाणी पोहचला.
- इ.स. १८९१ साली अमेरिकन शास्त्रज्ञ थॉमस एडीसन यांनी पहिल्यांदा किनेटोस्कोप यंत्राचे प्रदर्शन केले.
- सन १९९५ साली रशियाने मानव रहित अंतरीक्ष यान ‘स्पेक्त्र’ च प्रक्षेपण केलं.
- सन २०१४ साली भारतीय लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष बहूमताने सत्तेवर निवडून आला व नरेंद्र मोदी यांची भारताच्या पंतप्रधान पदी नियुक्ती करण्यात आली.
२० मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 20 May Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८१८ साली अमेरिकन एक्सप्रेस कंपनी आणि वेल्स फार्गो कंपनीचे सहसंस्थापक विल्यम फार्गो यांचा जन्मदिन.
- १८२२ साली नोबल पारितोषिक सन्मानित फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ फ्रेडेरिक पॅसी यांचा जन्मदिन.
- इ.स. १८५० साली आधुनिक मराठी भाषेचे लेखक, अभ्यासक व केसरी या पहिल्या मराठी वृत्तपत्राचे सहसंस्थापक तसचं, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून प्रसिद्ध असलेले मराठी साहित्यिक विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा जन्मदिन.
- १८५१ साली जर्मन वंशीय अमेरिकन संशोधक तसचं ग्रामोफोन रेकॉर्ड चे शोधक एमिल बर्लिनर यांचा जन्मदिन.
- इ.स. १८६० साली नोबल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ व प्राणीशास्त्रज्ञ एड्वार्ड बुचनर यांचा जन्मदिन.
- १८८२ साली नोबेल पारितोषिक विजेता सुप्रसिद्ध नॉर्वेजियन कादंबरीकार व लेखक सिग्रिड उंडसेट यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८४ साली प्रख्यात भारतीय प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमिक्षक पांडुरंग दामोदर गुणे यांचा जन्मदिन.
- सन १९०० साली भारतीय साहित्य क्षेत्रांतील नोबेल पुरस्कार म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय कवी सुमित्रानंदन पंत यांचा जन्मदिन.
- १९०६ साली सुप्रसिद्ध भारतीय आधुनिक शिल्पकार व चित्रकार रामकिंकर बैज यांचा जन्मदिन.
- सन १९१८ साली भारतीय सैन्य दलातील सर्वोच्च सन्मान परमवीर चक्र सन्मानित भारतीय लष्कर दलातील सेवानिवृत्त अधिकारी मेजर पिरुसिंह यांचा जन्मदिन.
२० मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 20 May Death / Punyatithi /Smrutidin
- सन १९२९ साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील क्रांतिकारक व महात्मा गांधी यांच्या चंपारण सत्याग्रहातील प्रमुख सदस्यांपैकी एक राजकुमार शुक्ल यांचे निधन.
- सन १९३२ साली ब्रिटीश कालीन भारतातील प्रसिद्ध क्रांतिकारक भारतीय राष्ट्रवादी कॉंग्रेस चे सदस्य, लेखक,वक्ते, समाजसुधारक तसचं, लाल-बाल-पाल या त्रिमुर्तींपैकी एक बिपीनचंद्र पाल यांचे निधन.
- १९५७ साली भारतीय स्वातंत्र्यसेना व राजकारणी तसचं, मद्रास प्रांताचे भूतपूर्व मुख्यमंत्री व आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री तंगुटुरी प्रकाशम पंतुळु यांचे निधन.
- सन १९९४ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष व आंध्रप्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री तसचं, महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल कासु ब्रह्मानंद रेड्डी यांचे निधन.
- २००० साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय व्यापारी, उद्योजक आणि गोदरेज समूहाचे माजी अध्यक्ष सोहराब पिरोज्शा गोदरेज यांचे निधन.
- सन २०१२ साली प्रसिद्ध भारतीय मानववंशशास्त्रज्ञ आणि स्त्रीवादी विद्वान लीला दुबे यांचे निधन.