19 November Dinvishes
१९ नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत काही महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या , तसेच काही प्रसिध्द व्यक्तींचे जन्म सुध्दा ह्याच दिवशी झाले होते . सोबतच ह्या दिवशी काही प्रसिध्द व्यक्तींचे निधन सुध्दा झाले होते याच सर्व घटनांचा आढावा आपण दिनविशेष च्या माध्यमाने घेत असतो , चला तर मग बघूया काय आहे आजचे दिनविशेष .
जाणून घ्या 19 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 19 November Today Historical Events in Marathi
19 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 19 November Historical Event
- तत्कालीन रशिया मध्ये १८२४ साली आलेल्या भीषण पुरात जवळपास दहा हजार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
- तुर्की या देशाच्या राजकुमाराला म्हणजेच अब्दुल माजीद द्वितीय ह्याला १९२२ साली खलिफा म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
- स्पेन ह्या देशाला १९५२ साली युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्यत्व देण्यात आले होते.
- आजच्याच दिवशी १९८२ साली नवव्या आशियाई खेळांची भारतात दिल्ली येथे सुरुवात झाली होती.
- पर्यावरण संबधी सुरक्षा कायदा १९८६ साली आजच्याच दिवशी लागू करण्यात आला होता.
- ऐश्वर्या रॉयला आजच्याच दिवशी १९९४ सालीची जागतिक सुंदरी म्हणून निवडण्यात आले होते .
- कर्नम्मा मल्लेश्वरी ने आजच्याच दिवशी १९९५ साली भारोत्त लन स्पर्धेत विश्वकिर्तीमान स्थापित केला होता.
- १९९७ साली आजच्याच दिवशी कल्पना चावला अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला बनली होती.
- २००६ साली आजच्याच दिवशी भारताने ऑस्ट्रेलिया या देशाला परमाणु उर्जा व युरेनियम पुरवण्या संबधी समर्थन मागितले होते.
19 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 19 November Birthday / Jayanti / Birth Anniversary
- प्रसिध्द भारतीय स्वतंत्रता सेनानी वीरांगना राणी लक्ष्मीबाई हिचा १८२८ साली जन्म झाला होता.
- प्रसिध्द सामाजिक व धार्मिक सुधारक केशवचंद्र सेन यांचा १८३८ साली जन्म झाला होता.
- भारताची चौथी पंतप्रधान इंदिरा गांधी हिचा १९१७ साली जन्म झाला होता.
- हिंदी चित्रपट सृष्टीचे प्रसिध्द संगीतकार सलील चौधरी यांचा १९२३ साली जन्म झाला होता.
- हिंदी व भोजपुरी भाषेचे प्रसिध्द साहित्यकार विवेकी राय यांचा १९२४ साली जन्म झाला होता.
- प्रसिध्द अभिनेते व मल्ल दारा सिंह यांचा १९२८ साली जन्म झाला होता.
- हिंदी सिनेसृष्टीची प्रसिध्द अभिनेत्री झीनत अमान हिचा १९५१ साली जन्म झाला होता.
- भारताची प्रथम विश्वसुंदरी व अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा १९७५ साली जन्म झाला होता.
19 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 19 November Death / Punyatithi / Smrutidin
- प्रसिध्द उपन्यासकार वाचस्पती पाठक यांचा १९८० साली आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता.
- समाजसुधारक व सर्वोदय आश्रम या संस्थेचे संस्थापक रमेशभाई यांचे २००८ साली निधन झाले होते.