18 September Dinvishes
मित्रांनो, इतिहासात घडलेल्या घटनांमुळे प्रत्येक दिवसाचे विशेष असं काही महत्व असते. घडलेल्या घटना कालांतराने कालबाह्य होत जातात आणि त्यालाच आपण इतिहास म्हणून संबोधतो. अश्याच प्रकारच्या काही ऐतिहासिक घटना ज्या आजच्या दिवशी घडल्येल्या आहेत. त्यांची संपूर्ण माहिती तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन असणारे महत्वपूर्ण व्यक्ती आणि निधन पावणारे व्यक्ती याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या १८ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 18 September Today Historical Events in Marathi
१८ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 18 September Historical Event
- इ.स. १८०८ साली प्रख्यात इंग्रजी साहित्यिक शेक्सपिअर यांचे रॉयल नामक थेटरची दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा सुरु करण्यात आले.
- इ.स. १८५१ साली पुलित्झर पुरस्कार सन्मानित अमेरिकन वर्तमानपत्र न्यूयॉर्क टाइम्स चे प्रकाशन सुरु करण्यात आलं.
- सन १९४७ साली भारतीय राष्ट्रीय सुरक्षा कायदा पास करण्यात आला.
- सन १९४७ साली अमेरिकन वायू दलाची स्थापना करण्यात आली.
- सन १९६७ साली भारतातील उत्तरपूर्व राज्य नागालँड ने इंग्रजी भाषेला आपली राजकीय आधिकारिक भाषा म्हणून घोषित केलं.
- सन १९४७ साली अमेरिकन गुप्तचर संस्था सी.आय. ए ची स्थापना करण्यात आली.
- सन १९९७ साली महाराष्ट्र सरकारने कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना रामटेक नागपुर येथे केली.
१८ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 18 September Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स १८८३ साली इंग्लंडमध्ये शिकत असतांना ब्रिटीश अधिकारी विलियम कर्झन व्हायली यांची हत्या करणारे थोर भारतीय क्रांतिकारक व स्वातंत्र्य सेनानी शहीद मदन लाल धिंग्रा यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९५ साली ब्रिटीश कालीन भारतातील नवानगर राज्याचे महाराज व ब्रिटीश संघातील भारतीय कसोटी क्रीकेटपटू महाराजा रणजीत सिंह यांचा जन्मदिन.
- सन १९०० साली मॉरिशस देशाचे पहिले मुख्यमंत्री, पंतप्रधान व गव्हर्नर जनरल शिवसागर रामगुलाम यांचा जन्मदिन.
- सन १९०६ साली भारतीय हास्य कवी काका हाथरसी यांचा जन्मदिन.
- सन १९१२ साली भारतीय चित्रपट व रंगभूमी अभिनेते व दिग्दर्शक गजानन हरि उर्फ राजा नेने यांचा जन्मदिन.
- सन १९५० साली पद्मश्री व राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री शबाना आझमी यांचा जन्मदिन.
- सन १९८३ साली भारतीय दूरदर्शन मालिका कलाकार सनाया इरानी यांचा जन्मदिन.
- सन १९८९ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय बॅडमिंटन खेळाडू अश्विनी पोन्नापा यांचा जन्मदिन.
१८ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 18 September Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १८५९ साली भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य उठावातील अग्रगण्य क्रांतिकारी तात्या टोपे यांचे निधन.
- इ.स. १८९९ साली बंगाल नवजागृतीचे भारतीय लेखक आणि बौद्धिक राजनारायण बसु यांचे निधन.
- सन १९५८ साली भारतरत्न पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय थियोसोफिस्ट आणि सार्वजनिक व्यक्ती भगवान दास यांचे निधन.
- सन १९९२ साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश व देशाचे सहावे उपराष्ट्रपती मोहम्मद हिदायतुल्लाह यांचे निधन.
- सन १९९५ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक हास्यकवी काका हाथरसी यांचे निधन.
- सन १९९९ साली महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट दिग्दर्शक अरुण वासुदेव कर्नाटकी यांचे निधन.
- सन २००२ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी साहित्यिक, कादंबरीकार शिवाजी सावंत यांचे निधन.
- सन २००४ साली दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक व लेखक डॉ. भालचंद्र दिनकर फडके यांचे निधन.