18 October Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी आपल्या इतिहास काळात घडून गेलेल्या काही ठराविक घटना तसचं, आजच्या दिवशी जन्मदिन तसचं निधन पावणारे महान व्यक्ती यांच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या १८ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 18 October Today Historical Events in Marathi
१८ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 18 October Historical Event
- सन १९०६ साली महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी ‘डिप्रेस्ड क्लास मिशन’ ची स्थापना केली.
- सन १९१९ साली राम गणेश गडकरी लिखित ‘संगीत भावबंधन’ या नाटकाचा पहिला प्रयोग दीनानाथ मंगेशकरांच्या ‘बळवंत संगीत नाटक मंडळी’ ने सादर केला.
- सन १९२२ साली ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉरपोरेशनची स्थापना करण्यात आली.
- सन १९५१ साली पहिल्या इलेक्ट्रोनिक स्टुडिओ चा पाया जर्मनी देशांत रचला गेला होता.
- सन १९५४ साली अमेरिकन टेक्सास इंस्ट्रूमेंट्स कंपनी ने पहिल्यांदा ट्रांजिस्टर रेडियो विक्रीची घोषणा केली.
- सन १९६७ साली सोविएत रशियाचे ‘व्हेनेरा-४’ हे अंतराळयान शुक्रावर उतरवले.
- सन १९७२ साली प्रथम बहुउद्देशीय हेलिकॉप्टर एस. ए. 315 ची चाचणी बैंगलोर येथे घेण्यात आली.
१८ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 18 October Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८६१ साली महाराष्ट्रीयन मराठी भाषेचे इतिहासकार व भारतीय लेखक तसचं, ग्वाल्हेर राज्याचे मुख्य न्यायाधीश व पुणे येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारताचार्य चिंतामण विनायक वैद्य यांचा जन्मदिन.
- सन १९२५ साली भारतीय राजकारणी ब उत्तर प्रदेश तसेच उत्तराखंड राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांचा जन्मदिन.
- सन १९२५ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसचं, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय भारतीय नाट्य दिग्दर्शक आणि नाट्य शिक्षक तसचं, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) चे संचालक इब्राहीम अलकाजी यांचा जन्मदिन.
- सन १९५० साली प्रख्यात भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते ओम पुरी यांचा जन्मदिन.
- सन १९५६ साली सर्वोत्कृष्ट अमेरिकन माजी व्यावसायिक टेनिसपटू आणि प्रशिक्षक मार्टिना नवरातीलोवा यांचा जन्मदिन.
१८ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 18 October Death / Punyatithi /Smrutidin
- इ.स. १८७१ साली इंग्लिश गणितज्ञ,तत्ववेत्ता, शोधक आणि यांत्रिकी अभियंता तसचं, पहिल्या यांत्रिकी संगणकाचे जनक चार्ल्स बॅबेज यांचे निधन.
- सन १९०९ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे सोळावे अध्यक्ष आणि प्रख्यात बंगाली बॅरिस्टर लालमोहन घोष यांचे निधन.
- सन १९३१ साली विजेचा शोध लावणारे थोर अमेरिकन संशोधक आणि व्यावसायिक थॉमस अल्वा एडिसन यांचे निधन.
- सन १९५१ साली पहिल्या स्त्री नाटककार, गायिका व संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचे निधन.
- सन १९८३ साली माजी भारतीय क्रिकेटपटू व माजी क्रिकेट खेळाडू संजय मांजरेकर यांचे वडिल विजय लक्ष्मण मांजरेकर यांचे निधन.
- सन १९९६ साली भारतातील प्रमुख क्रांतिकारक रामकृष्ण खात्री यांचे निधन.
- सन २००४ साली भारतातील कुख्यात चंदनवादी तस्करी व नक्षलवादी वीरप्पन यांना ठार मारण्यात आले.