17 April Dinvishesh
मित्रानो, आज जागतिक हेमोफिलीया दिवस आहे. हिमोफिलिया म्हणजे काय तर हा एक रक्ताचा आजार समजला जातो. आपल्या शरीरातील रक्त गोठण्यासाठी तेरा घटकांची आवश्यकता असते. या आजाराची लक्षण काय तर, ज्या व्यक्तींच्या शरीरात आठव्या क्रमांकाचा घटक कमी असतो त्यांना ‘हिमोफिलिया ए’ नावाचा आजार होतो. तसचं, नऊ क्रमांकाचा घटक कमी असल्यास ‘हिमोफिलिया बी’ नावाचा आजार होतो. तर, अकरा क्रमांकाचा घटक कमी असल्यास ‘हिमोफिलिया सी’ नावाचा आजार होतो. हिमोफिलिया हा फार दुर्मिळ आजार असून, तो केवळ ०.०१ टक्के लोकांमध्ये आढळून येतो.
याव्यतिरिक्त, आजच्या दिवशी इतिहासात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिन, निधन, शोध आदी घटनांची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या १७ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 17 April Today Historical Events in Marathi
१७ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –17 April Historical Event
- सन १९४१ साली दुसर्या महायुद्धादरम्यान युगोस्लाव्हिया देश जर्मनीला शरण गेले.
- १९५० साली प्रख्यात भारतीय कायदा अभ्यासक, घटनाकार, न्यायाधीश, प्रख्यात वक्ता, शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसेवक बॅ. मुकुंदराव जयकर यांची पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- इ.स. १९५२ साली स्वातंत्र्य भारतातील पहिली लोकसभा अस्तित्वात आली.
- सन १९७० साली केनेडी स्पेस सेंटर येथून लॉन्च करण्यात आलेल्या अपोलो १३ या चंद्र्यानाच्या सर्व्हिस मॉड्यूलमधील ऑक्सिजन टाकी मिशनमध्ये दोन दिवस अयशस्वी झाल्यानंतर चंद्र लँडिंग थांबविण्यात आले व चंद्रावरून परत पृथ्वीवर सुखरूप परतले.
- इ.स. १९८३ साली भारतीय अवकाश संशोधन संस्थेने उपग्रह प्रक्षेपण वाहन(रॉकेट) ‘एसएलव्ही३’ चे प्रक्षेपण केले.
- सन १९९३ साली एसटीएस-५४ हे संशोधक अंतराळयान सुखरूप पृथ्वीवर परतले.
१७ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 17 April Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८२० साली अमेरिकेतील न्यूयॉर्क निकेरबॉकर्स बेस बॉल क्लबचे संस्थापक सदस्य तसचं, “बेसबॉलचे जनक” म्हणून आपली ओळख जगाला करून देणरे अलेक्झांडर कार्टराईट यांचा जन्मदिन.
- सन १८९१ साली महाराष्ट्रीयन कोशकार चिं. ग. कर्वे यांच्या साह्याने ‘महाराष्ट्र मंडळ कोष’ ची स्थापना करून आठ खंडांच्या ‘महाराष्ट्र शब्दकोश’ ची निर्मिती करणारे महान कोशकार यशवंत रामकृष्ण दाते यांचा जन्मदिन.
- इ.स. १९१२ साली भारतीय कादंबरीकार आणि मल्याळम साहित्याचे लघुकथा लेखक थकाझी शिवसंकरा पिल्लई यांचा जन्मदिन.
- सन १९१६ साली श्रीलंकेच्या सहाव्या व जगातील पहिल्या महिला पंतप्रधान सिरिमाओ भंडारनायके यांचा जन्मदिन.
- इ.स. १९४१ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री बिंदू नानूभाई देसाई उर्फ बिंदू यांचा जन्मदिन.
- सन १९४३ साली भारतीय इतिहासकार व प्राध्यापक डॉ. एन. एन. नामपोथीरी यांचा जन्मदिन.
- इ.स. १९४६ साली भारतीय मानव आणि लोकसंख्या अनुवंशशास्त्रज्ञ तसचं, एप्लाइड जेनेटिक्स इंस्टिट्यूटमधील कॉम्प्यूटेशनल जीनोमिक्स सेंटरचे माजी संचालक रणजित चक्रवर्ती यांचा जन्मदिन.
- सन १९६१ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय बिलियर्ड्स स्नूकर खेळाडू गीत सिरीराम सेठी यांचा जन्मदिन.
- इ.स. १९७७ साली माजी भारतीय क्रिकेटपटू दिनेश मुंग्या यांचा जन्मदिन.
- सन १९७२ साली श्रीलंकन प्रसिध्द माजी क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरण यांचा जन्मदिन.
१७ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –17 April Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १७९० साली अमेरिकन तत्त्वज्ञ व विजेच्या शक्तीचे शोधक बेंजामिन फ्रँकलिन यांचे निधन.
- सन १९४६ साली भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते व्ही. एस. श्रीनिवासशास्त्री यांचे निधन.
- इ.स. १९९७५ साली स्वातंत्र्य भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे निधन.
- सन १९९७ साली भारतातील ओडिशा राज्याचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांचे निधन.
- इ.स. २००१ साली महाराष्ट्रीयन मराठी वनस्पती शास्त्रज्ञ व देवराई अभ्यासक प्रा. डॉ. वामन दत्तात्रेय वर्तक यांचे निधन.
- सन २००४ साली भारतीय चित्रपट क्षेत्रांतील तमिळ, मल्याळम, हिंदी, तेलगू आणि कन्नड भाषिक चित्रपटामध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्या व चित्रपट निर्माता सौंदर्य सत्यनारायण यांचे निधन.
- इ.स. २००५ साली भारतीय राज्य उत्तरप्रदेश आणि हिमाचल प्रदेशाचे माजी राज्यपाल विष्णू शास्त्री यांचे निधन.
- सन २०११ साली महाराष्ट्रीयन विनोदी साहित्यिक वि. स. बुवा उर्फ विनायक आदिनाथ बुवा यांचे निधन.
- इ.स. २०१२ साली भारताच्या ओडिसा राज्याचे राजकारणी व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित कवी व पत्रकार नित्यानंद महापात्रा यांचे निधन.