16 October Dinvishes
मित्रांनो, आज जागतिक अन्न दिवस आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिन १६ ऑक्टोबर या दिनी साजरा करण्यात येतो. तसचं, मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवसाचे दिनविशेष जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या १६ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 16 October Today Historical Events in Marathi
१६ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 16 October Historical Event
- सन १९०५ साली बंगालचे ब्रिटीश गव्हर्नर लॉर कर्झन यांनी बंगालची फाळणी केली.
- सन १९२३ साली वॉल्ट डिस्ने आणि त्याचा भाऊ रॉय डिस्ने यांनी ‘द वॉल्ट डिस्ने कंपनी‘ ची स्थापना अमेरिकेत केली.
- सन १९५९ साली राष्ट्रीय महिला शिक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली.
- सन १९६४ साली चीन देशाने आपल्या सिक्यांग या प्रांतातील लोप नॉर या वाळवंटी भागात पहिली आण्विक चाचणी केली.
- सन १९६८ साली भारत वंशीय अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ हर गोविंद खुराना यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आला.
१६ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 16 October Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८४१ साली जपान देशाचे पहिले पंतप्रधान हिरोबुमी इतो(Itō Hirobumi) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८५४ साली आयरिश कवी आणि नाटककार ऑस्कर वाईल्ड (Oscar Wilde) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९० साली भारतीय वार्ताहर संपादक, थोर समाजसुधारक, नाटककार , लेखक व जाहिरात शास्त्रातील तज्ञ अनंत हरि गद्रे तथा समतानंद यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९६ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते, लोकसभेचे हंगामी सभापती, व साहित्यिक सेठ गोविंद दास यांचा जन्मदिन.
- सन १९०७ साली महाराष्ट्रीयन मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र व कवी सोपानदेव चौधरी यांचा जन्मदिन.
- सन १९४६ साली भारतीय राजकारणी व ओडिशा राज्याचे विद्यमान आणि चौदावे मुख्यमंत्री तसचं, बिजू जनता दलाचे अध्यक्ष नवीन पटनायक यांचा जन्मदिन.
- सन १९४८ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री , लेखिका, दिग्दर्शिका, निर्माता, नर्तक आणि राजकारणी हेमा मालिनी यांचा जन्मदिन.
१६ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 16 October Death / Punyatithi /Smrutidin
- सन १९५१ साली पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खां यांचे निधन.
- सन १९८१ साली इस्त्रायली लष्करी नेते आणि राजकारणी मोशे द्यान यांचे निधन.
- सन १९९४ साली पश्चिम बंगाल येथील भारतीय स्वातंत्र्य सेनानी, क्रांतिकारक व राजकारणी गणेश घोष यांचे निधन.
- सन २००२ साली महाराष्ट्रीयन मराठी लेखक व कादंबरीकार नागनाथ एस इनामदार यांचे निधन.