15 October Dinvishes
मित्रांनो, आज आपल्या देशाचे महान भौतिकशास्त्र वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन. त्यांना संपूर्ण जगात मिसाईल मैन या नावाने ओळखले जाते. तसचं, ए. पी. जे. अब्दुल कलाम हे आपल्या भारताचे अकरावे राष्ट्रपती देखील होऊन गेले आहेत. अश्या या महान नेता, वैज्ञानिक ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचे संयुक्त राष्ट्राने ठरविले. सन २०१० साली सयुक्त राष्ट्राने पहिला जागतिक विद्यार्थी दिन साजरा केला.
तसचं, मित्रांनो, आज जागतिक हातधुने दिन देखील आहे. जगभरातील लोकांना त्यांच्या हात धुण्याची सवय सुधारण्यासाठी व त्यांना हात धुण्यास प्रवृत्त करण्यासाठी तसचं, हात कश्याप्रकारे स्वच्छ धुवावे यासबंधी माहिती सांगण्यासाठी हा दिन साजरा करण्यात येतो.
जाणून घ्या १५ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 15 October Today Historical Events in Marathi
१५ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 15 October Historical Event
- इ.स. १८८८ साली गोपळ गणेश आगरकर यांच्या सुधारक पत्राची सुरुवात करण्यात आली.
- सन १९१७ साली जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माता हारी हिला पॅरिसजवळ गोळ्या घालून ठार करण्यात आलं.
- सन १९४९ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्रिपुरा राज्य भारतात समाविष्ट करण्यात आलं.
- सन १९७० साली अन्वर सदत यांची मिस्त्र देशाच्या राष्ट्रपती पदी नियुक्ती करण्यात आली.
- सन १९८८ साली उज्ज्वला पाटील ह्या संपूर्ण जगाची समुद्र यात्रा करणाऱ्या पहिल्या महिला बनल्या.
१५ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 15 October Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १५४२ साली हिंदुस्थानचे तिसरे मुघल शासक सम्राट अकबर यांचा जन्मदिन.
- सन १९२६ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्रीयन मराठी कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचा जन्मदिन.
- सन १९३१ साली भारतीय सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न पुरस्कार तसेच, पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय एरोस्पेस वैज्ञानिक, संशोधक व भारतीय मिसाईल मैन तसचं, भारताचे माजी अकरावे राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन.
- सन १९३४ साली प्रसिद्ध भारतीय कर्नाटकी संगीत शैलीतील बासरीवादक एन. रामाणी यांचा जन्मदिन.
- सन १९४९ साली प्रख्यात भारतीय पत्रकार, अर्थशास्त्रज्ञ, चार्टर्ड अकाउंटंट आणि एन.डी. टी. व्ही. वाहिनीचे संस्थापक प्रणोय रॉय यांचा जन्मदिन.
- सन १९५२ साली प्रसिद्ध भारतीय राजकारणी व छत्तीसगड राज्याचे पूर्व दुसऱ्या क्रमांकाचे मुख्यमंत्री रमण सिंह यांचा जन्मदिन.
- सन १९५७ साली भारत वंशीय अमेरिकन चित्रपट निर्माता व दिग्दर्शक मीरा नायर यांचा जन्मदिन.
१५ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 15 October Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १५९५ साली मध्ययुगीन भारतातीलप्रख्यात विद्वान साहित्यकार आणि पर्शियन कवी फैजी यांचे निधन.
- सन १९१७ साली पहिल्या महायुद्धात गाजलेल्या डच नर्तिका, सौंदर्यवती व गुप्तहेर महिला माता हारी यांचे निधन.
- सन १९६१ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी कवी, कादंबरीकार, निबंधकार आणि कथा लेखक सुर्यकांत त्रिपाठी यांचे निधन.
- सन १९७५ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित थोर भारतीय शिल्पकार, चित्रकार आणि ललित कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष देवी प्रसाद रॉय चौधरी यांचे निधन.
- सन १९९९ साली भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील अग्रगण्य क्रांतिकारक महिला व शहीद भगतसिंह यांच्या सहकारी दुर्गा भाभी यांचे निधन.
- सन २००२ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी साहित्यकार, नाटककार, लेखक व पटकथाकार वसंत सबनीस यांचे निधन.