15 April Dinvishesh
मित्रानो, आजचा दिवस हा इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला गेलेला दिवस आहे. इ.स १४६९ साली आजच्या दिवशी शीख धर्मांचे संस्थापक गुरु नानक जी यांचा जन्मदिवस. गुरु नानक जी यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारताच्या पूर्व भागातील पंजाब राज्याच्या तलवंडी या गावी झाला होता. सध्या स्थितीत तलवंडी हे ठिकाण पाकिस्तान मध्ये आहे. त्याच ठिकाणाला आता गुरु नानकाना साहब म्हणून ओळ्खल जाते.
याव्यतिरिक्त, काही ऐतिहासिक घटना, तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन, शोधकार्य आदी घटनांची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या १५ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 15 April Today Historical Events in Marathi
१५ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –15 April Historical Event
- इ.स. १६७३ साली मराठा साम्राज्याचे सर सेनापती प्रतापराव जाधव यांनी मुगल सम्राट बहलोलखान पठाण विरुद्ध मोठी लढाई जिंकली.
- सन १८९५ साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील थोर समाजसुधारक व क्रांतिकारक लोकमान्य टिळक यांनी सर्वप्रथम कोकणातील रायगड किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज याची जयंती साजरी केली.
- इ.स. १८९२ साली अमेरिकी बहुराष्ट्रीय कंपनी जनरल इलेक्ट्रिक स्थापना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या स्केनेक्टॅडी येथे करण्यात आली.
- सन १९२३ साली मधुमेह आजारावरील औषध इन्सुलिन हे बाजारात विक्रीस उपलब्ध झाले.
- इ.स. १९९४ साली भारताने गॅट करारास मान्यता दिली.
- सन १९९८ साली थम्पी गुरु म्हणून प्रसिद्ध असलेले फ्रेडरिक लेंज यांचे निधन.
१५ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 15 April Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १४५२ साली इटालियन गणित, अभियांत्रिकी, साहित्य, शरीरशास्त्र, भूविज्ञान, खगोलशास्त्र, वनस्पतिशास्त्र, जीवाश्मशास्त्र, तसचं, शोध, रेखाचित्र, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला व नकाशे बनविण्यात प्राविण्य असलेले महान व्यक्ती लिओनार्डो डी सेरो पियरो दा विंची यांचा आज जन्मदिन.
- सन१४६९ साली शीख धर्मांचे संस्थापक व शिखांचे पहिले गुरु गुरु नानकजी यांचा जन्मदिन.
- इ.स. १५६३ साली शिखांचे पाचवे गुरु गुरु अर्जुन देव यांचा जन्मदिन.
- सन १८९३ साली भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, लेखक आणि संत साहित्य समीक्षक नरहर रघुनाथ फाटक यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९४ साली शीत युद्धाकालीन सोवियत संघाचे राष्ट्राध्यक्ष निकिता सर्गेविच ख्रुश्चेव यांचा जन्मदिन.
- सन १९१२ साली भारतीय उद्योजक तसचं, वैदिक अभ्यासक मल्हार सदाशिव “बाबूरावजी” पारखे यांचा जन्मदिन.
- इ.स. १९२२ साली भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रांतील गीतकार व उर्दू लेखक हसरत जयपुरी यांचा जन्मदिन.
- सन १९३२ साली महाराष्ट्र राज्यातील प्रख्यात मराठी भाषिक कवी व गझल सम्राट सुरेश भट यांचा जन्मदिन.
- इ.स. १९४० साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय शिखर घराण्यातील शास्त्रीय गायक व सारंगी वादक उस्ताद सुलतान खान यांचा जन्मदिन.
- सन १९७२ साली प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्या, क्रिकेट ग्लॅमर, फॅशन मूर्ती मंदिरा बेदी यांचा जन्मदिन.
१५ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –15 April Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स १७९४ साली महाराष्ट्रीयन मराठी पंडितकवी मोरेश्वर रामचंद्र पराडकर उर्फ मोरोपंत यांचे निधन.
- सन १८६५ साली अमेरिकन राजकारणी आणि वकील तसचं, माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचे निधन
- इ.स १९१२ साली आर. एम. एस. टायटॅनिक जहाजाचे कप्तान एडवर्ड जे. स्मिथ यांचे निधन.
- सन १९९५ साली मध्य प्रदेश राज्याचे पहिले मुख्यमंत्री लीलाधर जोशी यांचे निधन.
- इ.स २०१३ साली महाराष्ट्रातील मराठी संत साहित्याचे गाढे अभ्यासक वि. रा. करंदीकर यांचे निधन.