14 March Dinvishesh
१४ मार्च हा दिवस गणितीय प्रेमींचा खूप प्रिय दिवस आहे. कारण या दिवशी सन १९८८ साली भौतिकशास्त्रज्ञ लॅरी शॉ यांनी पायथागोरस यांच्या प्रमेयातील पाय π ची किंमत (π= 3.14) याला अनुसरून १४/३ या दिनाला पाय दिवस म्हणून घोषित केले. म्हणून हा दिवस पाय डे म्हणून साजरा करण्यात येतो.
जाणून घ्या १४ मार्च रोजी येणारे दिनविशेष – 14 March Today Historical Events in Marathi
१४ मार्च या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 14 March Historical Event
- इ.स. १९३१ साली अर्देशिर इराणी दिग्दर्शित पहिला भारतीय बोलपट आलमआरा याचे प्रदर्शन मुबंई मधील मॅजेस्टिक सिनेमागृहात प्रथम करण्यात आले.
- सन १९५४ साली भारत सरकारतर्फे भारतीय राष्ट्रीय पुरस्कार साहित्य अकादमीची स्थापना दिल्ली येथे करण्यात आली.
- इ.स. १९५५ साली राजकुमार महेन्द्र हे नेपाल देशाचे राजा बनले.
- सन १९७६ साली अमेरिकेने नेवादा या ठिकाणी परमाणु चाचणी केली.
- इ.स. १९८८ साली गणित प्रेमीनी प्रथम पाय डे साजरा केला होता. पाय डे संकल्पना भौतिकशास्त्रज्ञ लॅरी शॉ यांनी 1988 मध्ये केली होती. (π= 3.14) ही पायाची किंमत दिनांक १४/३ प्रमाणे असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
- सन १९८८ साली प्रथम सोनिया गांधी राष्ट्रीय कॉंग्रेस पार्टीच्या अध्यक्ष बनल्या.
- इ.स. १९८८ साली जपान देशांत समुद्रांतर्गत रेल्वे वाहतुकीस प्रारंभ करण्यात आला.
- सन २०१० साली ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ.एस.एल. भैरप्पा यांच्या हस्ते ‘लोकसंस्कृती’चे उपासक आणि संशोधक डॉ.रा.चिं. ढेरे यांना ‘पुण्यभूषण पुरस्कार’ पुण्यात प्रदान करण्यात आला.
- इ.स. २००१ साली सिक्कीम राजाच्या महिला चोकिला अय्यर यांनी भारताच्या पहिल्या महिला परराष्ट्रसचिव म्हणून सूत्रे आपल्या हाती घेतली. त्या १९६४ च्या बॅंचमधील आय.ए.एस. अधिकारी आहेत.
- इ.स. २००७ साली कारगिल आणि स्कार्दू यादरम्यान भारत व पाकिस्तान यांच्यात बस सेवा प्रारंभ करण्याबद्दल सहमती झाली.
१४ मार्च या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 14 March Birthday / Jayanti/ Birth Anniversary
- सन १८३३ साली पहिली महिला दंतचिकित्सक हॉब्स टेलर यांचा जन्मदिवस.
- इ.स. १८७४ साली फिलिफ्स इलेक्ट्रोनिक्स कंपनीचे सहसंस्थापक आंतोन फिलिफ्स यांचा जन्मदिन.
- सन १८७९ साली प्रसिद्ध जर्मन वैज्ञानिक आल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्मदिन.
- इ.स. १९६१ साली ब्लॅकबेरी कंपनीचे संस्थापक माईक लाझारीडीस यांचा जन्मदिवस.
- सन १९६५ साली भारतीय चित्रपट सुष्टीतील मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध अभिनेता अमीर खान यांचा जन्मदिन.
- इ.स.१९७२ साली मणिपूर येथील मानवाधिकार कार्यकर्ता इरोम चानू शर्मिला यांचा जन्मदिन.
१४ मार्च या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 14 March Death/ Punyatithi/Smrutidin
- सन १८८३ साली जर्मन तत्ववेत्ता, अर्थशास्त्रज्ञ, इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, राजकीय सिद्धांतकार, पत्रकार आणि समाजवादी क्रांतिकारक असे अनेक पैलू अंगी असणारे महान व्यक्ती कार्ल मार्क्स यांचे निधन.
- इ.स. १९६३ साली भारताचे प्रमुख स्वतंत्रता सेनानी, राजस्थानचे पूर्व मुख्यमंत्री आणि ‘भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस’ चे प्रसिद्ध नेता जयनारायण व्यास यांचे निधन.
- सन १९९८ साली मराठी चित्रपट अभिनेते, निर्माता, आणि दिग्दर्शक दादा कोंडके यांचे निधन.
- इ.स. २०१० साली महाराष्ट्रीयन ज्ञानपीठ पुरस्कार विजेता लेखक आणि कवी विंदा करंदीकर यांचे निधन.
- सन २०१८ साली विश्व प्रसिद्ध इंग्रजी भौतिकशास्त्रज्ञ, लेखक तसेच, सिद्धांत कॉस्मोलॉजी सेंटर फॉर रिसर्चचे डायरेक्ट स्टीफन्स हॉकिंग यांचे निधन.
- १४ मार्च या दिवशी घडलेल्या ऐतिहासिक तसेच आधुनिक घटनांची संपूर्ण माहिती आपण येथे पाहणार आहोत.
आजच्या दिनी घडलेली वरील संपूर्ण माहिती इतिहासाच्या पानांमध्ये जमा झालेली आहे. त्याची माहिती आपणास व्हावी याकरिता या लेखाचे लिखाण करण्यात आले आहे. या माहितीच्या आधारे आपण आपल्या ज्ञानात भर टाकू शकता. धन्यवाद.