13 September Dinvishes
मित्रांनो, आजचा दिवस इतिहासात घडलेल्या अनेक कारणांसाठी ओळखला जातो. इतिहासात घडलेल्या घटनांनुसार देशांत १३ सप्टेंबर या दिवशी अनेक सुखद आणि दु:खद घटना घडल्या आहेत. त्याच घटनांची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या १३ सप्टेंबर रोजी येणारे दिनविशेष – 13 September Today Historical Events in Marathi
१३ सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 13 September Historical Event
- इ.स. १५९८ साली फ्रांस चे शासक हेनरी चतुर्थ (Henry IV) यांनी इसाई धर्माचा नांत चा प्रख्यात आदेश जारी केला.
- इ.स. १७८४ साली रेगुलेटिंग ॲक्टच्या दुर्बलतेवर मात करण्यासाठी आणि ब्रिटिशांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ब्रिटीश संसदेने पिट्स इंडिया ॲक्ट (PITS INDIA ACT) पास केला.
- सन १९१३ साली ब्रिटीश धातुशास्त्रज्ञ हॅरी ब्रेअर्ली (Harry Brearley) यांनी स्टेनलेस स्टीलचा आविष्कार केला.
- सन १९४८ साली हैदराबाद येथील निजाम सत्तेचे भारतात विलीनीकरण करण्यासाठी भारतीय सैनिकांनी ‘ऑपरेशन पोलो’ ही लष्करी मोहीम राबवली.
- सन २००० साली चीनच्या शेनयांग येथे 1 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2000 दरम्यान खेळण्यात आलेली 24-खेळाडूंची श्रेणी XVI ची बुद्धिबळ स्पर्धा म्हणजेच फिड वर्ल्ड कप (FIDE) विश्वनाथ आनंद यांनी जिंकला.
- सन २००८ साली दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेत ३० जण ठार तर सुमारे १३० जण जखमी झाले.
१३ सप्टेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 13 September Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८४५ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे ब्रिटीश अध्यक्ष हेनरी कॉटन (Henry Cotton) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८५७ साली अमेरिकन चॉकलेट व्यावसायिक ‘द हर्शे चॉकलेट’ कंपनीचे संस्थापक मिल्टन एस॰ हर्शे (Milton S. Hershey) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८६ साली नोबल पारितोषिक विजेते ब्रिटीश सेंद्रिय रसायनशास्त्रज्ञ रॉबर्ट रॉबिन्सन(Robert Robinson) यांचा जन्मदिन.
- सन १९२६ साली ब्रिटीश कालीन भारतातील पहिल्या महिला क्रांतिकारक नागेंद्र बाला यांचा जन्मदिन.
- सन १९३२ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय किराणा घराण्यातील शास्त्रीय गायिका, संगीतकार व लेखक डॉ. प्रभा अत्रे यांचा जन्मदिन.
- सन १९३९ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी व निबंधकार भागवत रावत यांचा जन्मदिन.
- सन १९४६ साली परमवीर चक्र पुरस्कार सन्मानित भारतीय सैन्य दलाचे अधिकारी मेजर रामास्वामी परमेश्वरन यांचा जन्मदिन.
- सन १९६७ साली अमेरिकन निवृत्त धावपटू माइकल जॉनसन(Michael Johnson) यांचा जन्मदिन.
- सन १९६९ साली दिग्गज ऑस्ट्रेलियन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व क्रिकेट भाष्यकार शेन वॉर्न (Shane Warne) यांचा जन्मदिन.
- सन १९७३ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री महिमा चौधरी यांचा जन्मदिन.
१३ सप्टेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 13 September Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १८९३ साली भारतीय पत्रकार, विचारवंत आणि प्रार्थना समाजाचे एक संस्थापक व संवर्धक मामा परमानंद यांचे निधन.
- सन १९२८ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी कवी, तसचं, लखनौ येथे भरलेल्या पाचव्या हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीधर पाठक यांचे निधन.
- सन १९२९ साली थोर भारतीय क्रांतिकारक व स्वातंत्र्य कार्यकर्ते तसचं, भगतसिंग यांचे सहकारी जतिंद्रनाथ दास उर्फ जतीन दास यांचे ६३ दिवसाच्या उपोषणानंतर लाहोर कारागृहात त्यांचे निधन झाले.
- सन १९७१ साली महाराष्ट्रीयन मराठी रंगभूमी कलाकार व नाट्यशिक्षक केशवराव त्र्यंबक दाते यांचे निधन.
- सन १९९७ साली भारतीय हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध गीतकार लालजी पाण्डेय उर्फ अंजान यांचे निधन.
- सन २०१२ साली भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी २१ मुख्य न्यायाधीश व भारतीय मानवी हक्क आयोगाचे पहिले अध्यक्ष रंगनाथ मिश्रा यांचे निधन.