13 July Dinvishes
मित्रांनो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. तसचं, काही महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन आणि त्यांचे महत्वपूर्ण कार्य व शोध आदी संबंधी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रंनो आजच्या दिवशी आपल्या महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई नगरीमध्ये सन २००६ साली सलग ऐकामागून एक असे तीन बॉम्बस्फोट झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरून गेल होत. या गोष्टीची पुनरावृत्ती सन २०११ साली पुन्हा घडून आली होती.
जाणून घ्या १३ जुलै रोजी येणारे दिनविशेष – 13 July Today Historical Events in Marathi
१३ जुलै या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 13 July Historical Event
- इ.स. १६६० साली मराठा योद्धा बाजी प्रभु देशपांडे आणि आदिलशाह सल्तनतचे सेनापती सिद्दी मसूद यांच्यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुर शहरालगत असलेल्या विशालगडच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराच्या कडेला पावनखिंडची लढाई झाली.
- इ.स. १८०३ साली राजा राम मोहन राय आणि अलेक्झांडर डफ यांनी आपल्या पाच विद्यार्ध्यांसोबत स्कॉटिश चर्च महाविद्यालयाची स्थापना केली.
- सन १९०५ साली कलकत्ता येथील साप्ताहिक वर्तमानपत्र ‘संजीवनी’ मध्ये पहिल्यांदा विदेशी मालाचा बहिष्कार करा म्हणून प्रकाशित करण्यात आलं.
- सन १९२९ साली लाहोर येथिल तुरुंगात कैदेत असतांना क्रांतिकारक जतींद्रनाथ दास यांनी उपोषण करण्यास सुरवात केली.
- सन २००६ साली ईराण देशांतील अणुबॉम्ब निर्माण प्रकरण संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे देण्यात आले.
- सन २०११ साली महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झालेल्या तिहिरी बॉम्बस्फोटांमुळे संपूर्ण शहर हादरून गेलं होत.
१३ जुलै या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 13 July Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८६३ साली अँग्लो-इंडियन इजिप्ततज्ञ, पुरातत्वशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि लोककलाकार तसचं, युनायटेड किंगडममधील पुरातत्व शाखेच्या प्राध्यापक मार्गारेट अलीस मुरे(Margaret Alice Murray) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९२ साली भारताच्या राजस्थान राज्यातील जयपूर-अतरौली घराण्यातील प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्मदिन.
- सन १९३० साली माजी भारतीय क्रिकेटपटू व माजी भारतीय कसोटी क्रिकेट पंच स्वरूप किशन यांचा जन्मदिन.
- सन १९४० साली भारतीय विद्वान, कादंबरीकार, लघुकथा लेखक आणि इंग्रजी आणि हिंदी साहित्याच्या कवी सुनिता जैन यांचा जन्मदिन.
- सन १९४२ साली प्रसिद्ध अमेरिकन चित्रपट अभिनेता व पर्यावरणवादी कार्यकर्ता हॅरिसन फोर्ड(Harrison Ford) यांचा जन्मदिन.
- सन १९४४ साली हंगेरीयन शोधक, आर्किटेक्ट(रचनाकार) आणि आर्किटेक्चरचे प्राध्यापक तसचं, रुबीक क्यूब व त्यासंबंधीत यांत्रिक कोडचे निर्माता एरनो रुबिक ( Ernő Rubik) यांचा जन्मदिन.
- सन १९५३ साली राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सन्मानित भारतीय तमिळ भाषिक कवी, गीतकार आणि कादंबरीकार वैरामुथू रामासामी यांचा जन्मदिन.
- सन १९६४ साली माजी भारतीय क्रिकेटपटू उत्पल चटर्जी यांचा जन्मदिन.
१३ जुलै या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 13 July Death / Punyatithi /Smrutidin
- सन १९६९ साली बंगाली शिक्षणतज्ञ, लेखक, तत्वज्ञानी आणि पूर्व पाकिस्तानचे भाषाशास्त्रज्ञ मुहम्मद शाहिदुल्ला यांचे निधन.
- सन १९८० साली बोत्सावना देशाचे पहिले अध्यक्ष सेरेत्से गोएत्सेबेंग माफीरी खामा यांचे निधन.
- सन १९९४ साली भारतीय शास्त्रीय गायक आणि शिक्षक कृष्णा गुंडोपंत गिंडे यांचे निधन.
- सन १९९५ साली ज्ञानपीठ पुरस्कार विजेता भारतीय बंगाली भाषिक कादंबरीकार आणि कवी आशापूर्ण देवी यांचे निधन.
- सन १९९५ साली भारतीय पत्रकार आणि स्तंभलेखक तसचं, सुप्रसिद्ध भारतीय चित्रपट मसिक लेखिका देवयानी चौबाल यांचे निधन.
- सन २००० साली प्रख्यात महाराष्ट्रीयन मराठी कवी इंदिरा संत यांचे निधन.
- सन २००९ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय हिंदी मराठी चित्रपट अभिनेते निळूभाऊ फुले यांचे निधन
- सन २०१० साली भारतीय संगीत दिग्दर्शक, सैक्सोफोनिस्ट आणि चित्रपट संगीतकार तसचं, गीतकार आर. डी. बर्मन यांचे मुख्य संयोजक मनोहर सिंह यांचे निधन.