13 April Dinvishesh
मित्रानो, आजच्या दिवशी स्वातंत्र्यपूर्व भारतात जालियनवाला बाग ही सर्वात भयंकर व दुखद घटना घडली होती. पंजाबमधील अमृतसर शहराच्या जालियनवाला बागेत बैसाखी सनाच्या निमित्ताने एक शांतीपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आलं होत. या सभेत हजारो लोकांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी ब्रिटीश शासक जनरल डायर यांनी आपल्या सैनिकांना जमलेल्या नागरिकांवर गोळीबार करण्यास सांगितले यात सुमारे ३६९ लोकांचे निधन झाले व १२०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते.
इतिहास काळात घडलेली ही सर्वात दु:खद घटना आहे. यानिमित्ताने आजच्या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांडा प्रकरणी निधन पावलेल्या नागरिकांचा स्मरण म्हणून हा दिवस जालियनवाला बाग स्मृति दिवस म्हणून पाळण्यात येतो.
या व्यतिरिक्त आजच्या दिवशी घडलेल्या काही ऐतिहासिक घटना तसचं, महत्वपूर्ण व्यक्ती जन्मदिन, निधन, शोध आदी घटनांची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या १३ एप्रिल रोजी येणारे दिनविशेष – 13 April Today Historical Events in Marathi
१३ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –13 April Historical Event
- इ.स. १६४८ साली दिल्ली येथील लाल किल्ल्याची निर्मिती झाली.
- सन १६९९ साली शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंह यांनी खालसा पंथाची स्थापना केली.
- इ.स. १७३१ साली छत्रपती शाहू महाराज आणि राणी ताराबाई यांच्यात इतिहासप्रसिद्ध वारणेचा तह होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या स्वराज्याची दोन भागात विभागणी करण्यात आली.
- सन १७७२ साली वॉरन हेस्टिंग्ज यांची बंगाल प्रांतातील कलकत्ता शहराचे गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- इ.स. १८४९ साली हंगेरी देश प्रजासत्ताक देश बनला.
- सन १९१९ साली पंजाबमधील अमृतसर शहरातील जालियनवाला बागेत बैसाखी उत्सवानिमित्त एकत्र जमलेल्या नागरिकांवर ब्रिटीश शासक जनरल डायर यांनी आपल्या सैनिकांना बेसुट गोळीबार करायला सांगितला. स्वातंत्र्यपूर्व काळात घडलेली ही सर्वात मोठी घटना आहे. या घटनेत सुमारे ३७९ लोक मृत्युमुखी पडले होते
- इ.स. १९३९ साली मगनलाल बागडी आणि पंडित श्याम नारायण यांनी भारतात हिंदुस्थानी लाल सेनेची स्थापना केली.
- सन १९४२ साली मराठी चित्रपट निर्माते व अभिनेते वी. शांताराम चित्रपट निर्मित कंपनी ‘प्रभात’ पासून विभक्त होऊन स्वत:च्या ‘राजकमल कलामंदिर‘ स्टुडीओची निर्मिती केली.
- इ.स. १९४८ साली भुवनेश्वर शहराला ओडिसा राज्याची राजधानी म्हणून घोषित करण्यात आलं.
- सन १९६० साली अमेरिकेने विश्वातील पहिला परिवहन उपग्रह ‘ट्रांझिट १ बी’ चे प्रक्षेपण केलं.
- इ.स. २००० साली प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री लारा दत्ता ह्या विश्वसुंदरी बनल्या.
- सन २०१७ साली इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी वारणा नदीवर आधारित ‘अमृत’ योजनेचा प्रारंभ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केला गेला.
१३ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 13 April Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १७४३ साली अमेरिकेचे माजी राष्ट्रपती व उपाध्यक्ष तसचं, राजकारणी, मुत्सद्दी, वकील, आर्किटेक्ट, तत्ववेत्ता आणि संस्थापक थॉमस जेफरसन यांचा जन्मदिन.
- सन १८९० साली भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता तसचं, भारतातील विशिष्ट लांबीचा चित्रपट ‘श्री पुंडलिक’ चे निर्माता रामचंद्र गोपाळ उर्फ “दादासाहेब” तोरणे यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९८ साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व पटकथा लेखक चंदूलाल शाह यांचा जन्मदिन.
- सन १८९५ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय पॅथॉलॉजिस्ट (रोगनिदानतज्ञ) तसचं, भारतातील वैद्यकीय संशोधनाचे जनक वसंत रामजी खानोलकर यांचा जन्मदिन. कर्करोग, रक्त गट आणि कुष्ठरोग या सारख्या साथीच्या आजारांचे संशोधन करण्यात त्यांनी आपले महत्वपूर्ण योगदान दिल.
- इ.स. १९०५ साली इटालियन प्रयोगशील भौतिकशास्त्रज्ञ तसचं,अनुभौतिकशास्त्र आणि कॉस्मिक किरणांच्या अभ्यासाचे योगदाते ब्रुनो बेनेडेटो रोसी यांचा जन्मदिन.
- सन १९१३ साली भारतीय क्रांतिकारक व थोर स्वातंत्र्य सैनानी दत्ताजी ताम्हाणे यांचा जन्मदिन.
- इ.स. १९२५ साली स्वातंत्र्यपूर्व भारताच्या ब्रिटीश राजवटीमधील सक्रीय स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध चित्रपट गीतकार वर्मा मलिक यांचा जन्मदिन.
- सन १९४० साली दिल्ली येथील केंद्रीय विद्यालय जामिया मिलिया इस्लामियाच्या कुलपती नजमा अकबर अली हेप्तुल्ला यांचा जन्मदिन.
- इ.स. १९५६ साली भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा जन्मदिन.
- सन १९६३ साली रशियन बुद्धीबळ ग्रँडमास्टर, माजी विश्व बुद्धीबळ विजेता, लेखक आणि राजकीय कार्यकर्ते गॅरी किमोविच कास्परोव्ह यांचा जन्मदिन.
१३ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन –13 April Death / Punyatithi / Smrutidin
- सन १९५१ साली औंध संस्थानाचे अधिपती भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी यांचे निधन.
- इ.स. १९७३ साली भारतीय चित्रपट व रंगमंच अभिनेते, हिंदी लेखक, नाटककार युवतीष्ठिर साहनी उर्फ बलराज साहनी यांचे निधन.
- सन १९७३ साली भारतीय इतिहासकार, लेखक आणि संशोधक अनंत ककबा प्रियोळकर यांचे निधन.
- इ.स. २००० साली भारतीय चित्रपट निर्माते विश्वास नरहर सरपोतदार ऊर्फ बाळासाहेब सरपोतदार यांचे निधन.
- सन २००७ साली सुप्रसिद्ध भारतीय कवी, समीक्षक, अनुवादक आणि शास्त्रीय साहित्याचे प्रतिपादक मल्लमपल्ली सरभेश्वर सरमा उर्फ ‘सरभ्याय’ यांचे निधन.
- इ.स. २००८ साली महाराष्ट्रीयन मराठी संगीतकार दशरथ पुजारी यांचे निधन.