11 May Dinvishes
मित्रानो, इतिहास काळात घडलेल्या ऐतिहासिक घटनांच्या दृष्टीने प्रत्येक दिवसाचे काहीना काही महत्व हे असतेच. अश्याच प्रकारे आजच्या दिवसाचे देखील महत्व आहे. सन १८५७ साली भारतातील स्वातंत्र्य चळवळीच्या कार्यकर्त्यांनी सुरु केलेल्या स्वातंत्र्य संग्रामाचा उद्रेक हा दिल्ली तील इंग्रज सरकारमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय शिपायांमध्ये देखील उसळला. त्यांनी दिल्लीवरील इंग्रज अधिकाऱ्यांना पराभूत करून दिल्लीवर ताबा मिळवला व भारतातील शेवटचे मुघल सम्राट बहादुर शाह जफर यांना भारताचे शासक म्हणून घोषित केलं.
भारताच्या स्वातंत्र्यासाठी झालेला हा सर्वात मोठा उठाव होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी या उठावला भारतीय स्वातंत्र्याचा पहिला उठाव म्हटलं आहे. तसचं, आजच्या दिवशी भारतातील राजस्थान राज्यातील पोखरण या ठिकाणी भारतीय लष्करी दलाने सन १९९८ साली अणुबॉम्ब च्या यशस्वी चाचण्या घेतल्या. या दिवसाची आठवण म्हणून आजच्या दिवशी आपल्या देशांत राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा करण्यात येतो. याव्यतिरिक्त आपण या लेखाच्या माध्यमातून काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन, निधन व त्यांचे कार्य या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या ११ मे रोजी येणारे दिनविशेष – 11 May Today Historical Events in Marathi
११ मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 11 May Historical Event
- इ.स. १८५७ साली भारतातील प्रथम स्वातंत्र्य युद्धाचा भडका दिल्ली येथे उठला व तेथिल भारतीय शिपायांनी इंग्रज अधिकाऱ्यांकडून दिल्लीवर ताबा मिळविला.
- सन १८७८ साली महाराष्ट्रातील पुणे शहराच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले होते. यालाच अखिल भारतीय साहित्य संमेलन म्हणून संबोधले जाते.
- इ.स. १८८८ साली ज्योतिराव फुले यांनी मानवतेसाठी नि: स्वार्थ सेवा केल्या बद्दल मुंबईतील महान सुधारक ‘राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर’ यांनी त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना “महात्मा” ही पदवी बहाल केली.
- सन १९२७ साली दरवर्षी दिल्या जाणाऱ्या वार्षिक अकादमी पुरस्कार म्हणजेच ‘ऑस्कर’ पुरस्कार संस्थेची स्थापना करण्यात आली.
- इ.स. १९५१ साली दिल्लीचे तत्कालीन सुलतान मोहमद गझनी यांनी उध्वस्त केलेल्या बारा ज्योर्तिलिंगापैकी एक सोमनाथ या मंदिरात शिवलिंगाची प्रतिष्ठापना राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आली.
- सन १९८७ साली गोवा राज्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
११ मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 11 May Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८९५ साली भारतीय तत्ववेत्ता, वक्ते आणि लेखक जे. कृष्णमुर्ती यांचा जन्मदिन.
- सन १९१२ साली पाकिस्तानी लेखक व नाटककार सआदत हसन मंटो यांचा जन्मदिन.
- इ.स. १९१८ साली अमेरिकन पदार्थ वैज्ञानिक व भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमन यांचा जन्मदिन.
- सन १९४६ साली जर्विक-7 हे कृत्रिम हृदय विकसित करणारे महान अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक आणि उद्योजक रॉबर्ट कॉफलर जार्विक यांचा जन्मदिन.
- इ.स. १९५० साली सुप्रसिद्ध भारतीय हिन्दी-मराठी चित्रपट अभेनिते सदाशिव दत्ताराय अमरापूरकर यांचा जन्मदिन.
- सन १९७२ साली भारतीय क्रिकेटपटू जेकब जोसेफ मार्टिन यांचा जन्मदिन.
११ मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 11 May Death / Punyatithi / Smrutidin
- इ.स. १८८५ साली एकोणिसाव्या शतकातील भारतीय विचारवंत लोकनेते व बंगाल ख्रिश्चन असोसिएशनचे पहिले अध्यक्ष कृष्णमोहन बॅनर्जी यांचे निधन.
- इ.स. १८८९ साली इंग्लंड देशातील बर्मिंघम येथील चॉकलेट व्यावसायिक व चॉकलेट कॅडबरीचे संस्थापक जॉन कॅडबरी यांचे निधन.
- सन १९९३ साली भगवान कृष्ण आणि संत ज्ञानेश्वर यांच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असणारे भारतीय हिंदी व मराठी चित्रपट अभिनेते शाहू मोडक यांचे निधन.
- इ.स. २००२ साली भोपाळ येथील रियासतेच्या राजकुमारी व भारतातील पहिल्या महिला वैमानिक आबिदा सुल्तान यांचे निधन.
- सन २००४ साली भारतीय महाराष्ट्रीयन नृत्यदिग्दर्शक, लेखक, चित्रकार व शिक्षक कृष्णदेव मुळगुंद यांचे निधन.
- इ.स. २००९ साली भारतीय नौदलाचे एडमिरल सरदारलाल मथरादास नंदा यांचे निधन.