10 November Dinvishes
१० नोव्हेंबर म्हणजेच आजच्या दिवशी देशविदेशांत काही महत्वाच्या घटना घडल्या होत्या, तसेच काही प्रसिध्द व्यक्तीचे जन्म व मृत्यू ह्या दिवशी झालेले आहेत. त्या सर्व बाबींचा आढावा आपण आजच्या दिनविशेष मध्ये घेणार आहोत, चला तर मग बघूया काय आहे आजच्या तारखेला विशेष
जाणून घ्या 10 नोव्हेंबर रोजी येणारे दिनविशेष – 10 November Today Historical Events in Marathi
10 नोव्हेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 10 November Historical Event
- गोटलिएब डीमेलर ने आजच्याच दिवशी १८८५ साली जगातील पहिली मोटर सायकल जगासमोर ठेवली होती.
- अमेरिकेचे लेखक विलियम फोक्नर यांना साहित्याकरिता १९५० सालीचा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
- मायक्रोसॉफ्ट चे मालक बिल गेट्स यांनी १९८३ साली विंडोज १.० ची सुरुवात केली होती.
- जर्मनी या देशात बर्लिन ची भिंत पाडण्याचे कार्य आजच्याच दिवशी १९८९ साली सुरु करण्यात आले होते.
- नायजेरिया या देशात पर्यावरण प्रेमी कार्यकर्ता व नाट्यकार केन सारो विवो यांना आठ लोकां समवेत तेथील सरकारने १९९५ या वर्षी आजच्याच दिवशी फासीवर चढविले होते.
- १९९७ साली आजच्याच दिवशी चीन व रशिया या दोन देशादरम्यान घोषणा पत्र कराराद्वारे सीमा विवाद संपुष्टात आला होता.
- भारतीय क्रिकेट संघाने २००८ साली आजच्याच दिवशी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा पराभव करीत बॉर्डर – गावस्कर चषक २-० ने जिंकला होता.
- झेंगझोऊ हे चीनचे सर्वात प्राचीन आठवे शहर म्हणून २००४ साली घोषित करण्यात आले होते.
- गंगा – मेकांग संपर्क परियोजनेचे कार्यास सुरुवात २००० साली आजच्याच दिवशी करण्यात आले होते.
- नासा या अमेरिकन अंतराळ संस्थेने फिनिक्स मिशन नावाच्या मंगळ ग्रहाशी निगडीत संशोधन करणाऱ्या प्रकल्पाच्या समाप्तीची २००८ साली घोषणा केली होती.
10 नोव्हेंबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 10 November Birthday / Jayanti / Birth Anniversary
- म्हैसूर राज्याचा शासक टिपू सुलतान याचा १७५० या वर्षी जन्म झाला होता.
- सुरेंद्रनाथ बैनर्जी यांचा १८४८ साली आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
- अमेरिका येथील गीतकार व संगीतकार जॉनी मार्क्स यांचा १९०९ साली जन्म झाला होता.
- मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांचा १९२० साली जन्म झाला होता.
10 नोव्हेंबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 10 November Death / Punyatithi / Smrutidin
- प्रसिध्द अरबी सुफी कवी इबने अरबी यांचा १२४० साली मृत्यू झाला होता.
- भारतीय स्वतंत्रता सेनानी कनाईलाल दत्त यांचे १९०८ साली निधन झाले होते.
- प्रसिध्द हिंदी साहित्यकार गंगाप्रसाद अग्निहोत्री यांचे १९३१ साली निधन झाले होते.
- फ्रांस चे पूर्व राष्ट्रपती चार्ल्स द ग्वाल यांचा १९७० साली मृत्यू झाला होता.
- प्रसिध्द शायर फजल ताबिश यांचे १९९५ साली निधन झाले होते.