10 May Dinvishes
मित्रांनो, आजचा दिवस हा इतिहासात घडलेल्या अनेक ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे असे म्हणने चुकीचे ठरणार नाही. कारण, आजच्या दिवशी इ.स १५२७ साली मुघल बादशाहा यांनी पानिपतची लढाई जिंकून भारताची तत्कालीन राजधानी आग्रा येथे जाऊन मुघल साम्राज्याची स्थापना केली होती. ही एकमेव अशी घटना आहे ज्यामुळे आपल्या देशातील संपूर्ण इतिहास भूगोल बदलून गेला. जगात दररोज नवीन नवीन रेकॉर्ड बनतात व तुटत असतात.
अश्याच प्रकारे भारताच्या गिर्यारोहक संतोष यादव यांनी सन १९९३ साली जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एवरेस्ट दुसऱ्यांदा सर केला व असा पराक्रम करणारे ते पहिले नागरिक बनले. याव्यतिरिक्त आजच्या दिवशी अनेक ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत त्यांची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या १० मे रोजी येणारे दिनविशेष – 10 May Today Historical Events in Marathi
१० मे या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 10 May Historical Event
- सन १५२६ साली पानिपतची लढाई जिंकल्या नंतर मुघल शासक बाबर देशाची तत्कालीन राजधानी आग्रा या ठिकाणी पोहचले.
- इ.स. १८१८ साली झालेल्या तिसऱ्या युद्धादरम्यान इंग्रज आणि मराठा यांच्यात तह होऊन मराठ्यांचा रायगड किल्ला इंग्रजांच्या ताब्यात देण्यात आला.
- सन १८२४ साली अमेरिका येथील राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय सर्वसामान्यांसाठी सुरु करण्यात आले.
- इ.स. १८५७ साली मिरज येथे स्वातंत्र्य संगारामाच्या पहिल्या चळवळीची ठिणगी पेटली.
- सन १९०९ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीश सरकारच्या आनंदोत्सवाला प्रत्युत्तर म्हणून लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये १८५७ च्या वीरांचा गौरव करणारा समारंभ आयोजित केला.
- इ.स. १९३७ साली स्वातंत्र्यवीर सावरकरांची रत्नागिरी येथील स्थानबद्धते मधून बिनशर्त मुक्तता करण्यात आली.
- सन १९८१ साली भारतात प्रथमच मुंबई येथे रात्रीच्यावेळी प्रकाश झोतात क्रिकेटचा सामना खेळवण्यात आला.
- इ.स. १९९३ साली संतोष यादव ही जगातील उंच पर्वतांपैकी एक असणारे माउंट एवरेस्ट दुसऱ्यांदा सर करणाऱ्या पहिल्या व्यक्ती ठरल्या.
१० मे या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 10 May Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८३४ साली आयरिश वंशीय भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष अल्फ़्रेड वेब यांचा जन्मदिन.
- इ.स. १८५५ साली भारतीय हिंदू धर्म गुरु, योगी, ज्योतिषी तसचं, भगवद्गीतेचे अभ्यासक व उपनिषदक, शिक्षक, लेखक आणि खगोलशास्त्रज्ञ श्री युक्तेश्वर गिरी यांचा जन्मदिन.
- सन १९०५ साली भारतीय बंगाली व हिंदी चित्रपट सृष्टीतील पार्श्वगायक व संगीतकार आणि अभिनेता पंकज मलिक यांचा जन्मदिन.
- इ.स. १९०९ साली भारताचे पहिले राष्ट्रीय ग्रंथपाल तसचं, नवी दिल्ली येथील भारतीय राष्ट्रीय वैज्ञानिक दस्तऐवजीकरण केंद्राचे पहिले संचालक बेल्लारी शामना केसावन यांचा जन्मदिन.
- सन १९१४ साली भारतीय राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित भारतीय हिंदी चित्रपट निर्माता व हिंदी चित्रपट क्षेत्रांतील सर्वात लोकप्रिय चित्रपट निर्मिती कंपनी राजश्री प्रॉडक्शनचे संस्थापक ताराचंद बडजात्या यांचा जन्मदिन.
- इ.स. १९१८ साली भारतातील बाह्य इंटेलिजेंस एजन्सी, रिसर्च अँड अॅनालिसिस विंगचे प्रथम प्रमुख भारतीय गुप्तचर अधिकारी रामेश्वर नाथ काव यांचा जन्मदिन.
- सन १९२७ साली भारतीय इंग्रजी भाषिक लेखिका नयनतारा सहगल यांचा जन्मदिन.
- इ.स. १९२९ साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय संविधान विशेषज्ञ व माजी लोकसभा सरचिटणीस सुभाष सी. कश्यप यांचा जन्मदिन.
- सन १९३२ साली सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि मराठी चित्रपट गीतकार जगदीश खेबुडकर यांचा जन्मदिन.
- इ.स. १९३७ साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी गद्य लेखक व कवी तसचं, मराठी गाण्याचे गीतकार माणिक गोडघाटे उर्फ ग्रेस यांचा जन्मदिन.
- सन १९८० साली कारगिल युद्धामध्ये केलेल्या कुशल कामगिरी करिता परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलेले सर्वात कमी वयाचे भारतीय लष्कर दलाचे कनिष्ठ आयुक्त अधिकारी सुभेदार मेजर योगेंद्र सिंह यादव यांचा जन्मदिन.
- इ.स. १९८६ साली अर्जुन पुरस्कार सन्मानित सुप्रसिद्ध भारतीय बुद्धिबळपटू पेंटाला हरिकृष्णा यांचा जन्मदिन.
१० मे या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 10 May Death / Punyatithi / Smrutidin
- सन १९३६ साली दिल्ली येथील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. मुख्तार अहमद अन्सारी यांचे निधन.
- इ.स. १९९८ साली प्रख्यात भारतीय स्वातंत्र्यसैनिक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचे निधन.
- सन २००० साली भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कवी ना. घ. देशपांडे यांचे निधन.
- इ.स. २००१ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे राजकीय राजकारणी व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव राजूसिंग नाईक यांचे निधन.
- सन २००२ साली भारतीय उर्दू कवी कैफी आझमी यांचे निधन.
- इ.स. २०१५ साली महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्हातील सुप्रसिद्ध इतिहासकार, लेखक आणि वक्ते निनाद गंगाधर बेडेकर यांचे निधन.