1 October Dinvishes
मित्रानो, आज आपण या लेखाच्या माध्यमातून आजच्या दिवशी इतिहास काळात घडलेल्या काही ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत. तसचं काही महत्वपूर्ण व्यक्तींचे जन्मदिन, निधन आणि त्यांच्या शोध कार्यांबद्द्ल माहिती जाणून घेणार आहोत.
मित्रांनो, आज आंतरराष्ट्रीय कॉफी दिन आहे. या दिनाचे उद्देश म्हणजे लोकांना कॉफीच्या पेयाचे महत्व पटवून देऊन त्यांना ते पेय वापरण्यास प्रोत्साहित करणे हा होय. आंतरराष्ट्रीय कॉफी ऑर्गनायझेशनने सहमती दर्शविल्यानुसार सन १ ऑक्टोबर 2015 सालापासून दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो.
तसचं, आज आंतरराष्ट्रीय वृद्ध व्यक्ती दिन देखील आहे. सन १४ डिसेंबर १९९० साली संयुक्त राष्ट्राच्या महासभेने ४५/१०६ च्या फरकाने ठराव मंजूर केल्यानुसार १ ऑक्टोबर १९९१ साली पहिला आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन साजरा करण्यात आला.
जाणून घ्या १ ऑक्टोबर रोजी येणारे दिनविशेष – 1 October Today Historical Events in Marathi
१ ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 1 October Historical Event
- इ.स. १८३७ साली इम्पीरियल पोस्टची स्थापना केली गेली आणि कलकत्ता सरकार आणि मुख्य प्रांतीय शहरांच्या दरम्यान कार्यक्षम पोस्टल संप्रेषण करण्यासाठी मक्तेदारी दिली गेली.
- इ.स. १८६९ साली ऑस्ट्रिया देशांत जगात पहिल्यांदा पोस्टकार्ड चा वापर करण्यात आला.
- सन १९४९ साली जनरल माओ त्से तुंग यांनी चीन लोकशाही वादी गणराज्य (पीपुल्स रिपब्लिक आफ़ चाइना) ची घोषणा केली.
- सन १९५३ साली भाषांवर आधारित भारतातील पहिले तेलगु भाषिक राज्य आंध्रप्रदेश राज्याची स्थापना करण्यात आली.
१ ऑक्टोबर या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 1 October Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८४७ साली ब्रिटिश समाजवादी, थियोसोफिस्ट, महिला हक्क कार्यकर्त्या, लेखक, वक्ते, शिक्षणतज्ज्ञ आणि परोपकारी तसचं, होमरूल लीग च्या संस्थापिका अॅनी बेझंट(Annie Besant) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८८१ साली अमेरिकन वैमानिक व बोईंग विमान कंपनीचे संस्थापक विलियम बोईंग(William E. Boeing) यांचा जन्मदिन.
- इ.स. १८९५ साली पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान नवाब लियाकत अली खान यांचा जन्मदिन.
- सन १९०६ साली भारतीय पार्श्वगायक व संगीतकार एस. डी. बर्मन यांचा जन्मदिन.
- सन १९१९ साली प्रसिद्ध भारतीय उर्दू कवी व भारतीय हिंदी चित्रपट गीतकार मजरूह सुल्तानपुरी यांचा जन्मदिन.
- सन १९१९ साली पद्मश्री पुरस्कार व संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन कवी, गीतकार, लेखक आणि पटकथाकार व अभिनेते गजानन दिगंबर उर्फ ग. दी. माडगुळकर यांचा जन्मदिन.
- सन १९२४ साली अमेरिकन राजकारणी व अमेरिकेचे माजी ३९ वे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर(Jimmy Carter) यांचा जन्मदिन.
- सन १९३० साली भारतीय राजकारणी व कर्नाटक राज्याचे १५ वे मुख्यमंत्री जे. एच. पटेल यांचा जन्मदिन.
- सन १९४५ साली भारतीय राजनीतिज्ञ व भारताचे विद्यमान १४ वे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचा जन्मदिन.
१ ऑक्टोबर या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 1 October Death / Punyatithi / Smrutidin
- सन १९३१ साली महाराष्ट्रीयन मराठी साहित्यात नाट्यछटा हा प्रकार रुजविणारे महान साहित्यिक व लेखक शंकर काशिनाथ गर्गे यांचे निधन.