1 June Dinvishes
मित्रांनो, आजचा दिवस हा जगभर आंतरराष्ट्रीय बाल सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. सन १९५० साली आंतरराष्ट्रीय महिला संघटनेच्या जगातील ५१ सदस्य देशांनी १ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बाळ सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. असे करण्यामागील त्यांचा मुख्य उद्देश म्हणजे जगातील लहान मुलांचे प्राण वाचविणे हा आहे. कारण, मुले हीच देशाचे भविष्य असतात, त्यामुळे त्यांचे संरक्षण करणे हे देशाचे कर्तव्य आहे. याची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी १ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय बाळ सुरक्षा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
तसचं, आज जागतिक दूध दिन देखील आहे. जगातील लोकांना दुधाचे महत्व पटवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न व कृषी संघटनेने जागतिक दूध दिनाची स्थापना केली. सन २००१ सालापासून १ जून या दिवशी हा दिवस साजरा करण्यात येतो. याव्यतिरिक्त, आपण या लेखाच्या माध्यमातून काही विशिष्ट व्यक्तींचे जन्मदिन, निधन आणि त्यांचे शोधकार्य तसचं, काही इतिहास कालीन ऐतिहासिक घटनांची माहिती जाणून घेणार आहोत.
जाणून घ्या १ जून रोजी येणारे दिनविशेष – 1 June Today Historical Events in Marathi
१ जून या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 1 June Historical Event
- इ.स. १८७४ साली स्वातंत्र्य पूर्व भारतातील ब्रिटीश सरकारची इस्ट इंडिया कंपनी संपुष्टात आली.
- सन १९२९ साली व्ही. शांताराम, धायबर, दामले आणि फत्तेलाल यांनी महाराष्ट्र चित्रपट निर्मित कंपनीच्या बाहेर जाऊन कोल्हापूर येथे स्वत:ची प्रभात चित्रपट कंपनी स्थापन केली.
- सन १९३० साली भारत देशांतील पहिली वातुनुकुलीत रेल गाडी दख्खनची राणी (डेक्कन क्वीन) ही प्रथम महराष्ट्रातील मुंबई ते पुणे या दोन शहरा दरम्यान सुरु करण्यात आली.
- सन १९४५ साली टाटा मुलभूत संशोधन संस्थेची स्थापना भारतीय विज्ञान संस्थेच्या परिसरात करण्यात आली.
- सन १९९२ साली भारत व इजराईल या दोन देशांतर्गत हवाई मार्गाबाबत करार करण्यात आला.
- सन १९९६ साली प्रख्यात भारतीय राजकारणी एच. डी. देवगौडा पंतप्रधान पदी विराजमान झाले.
- सन २००४ साली भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदाची सूत्रे रमेशचंद्र लाहोटी यांनी आपल्या हाती घेतली.
- सन २००७ साली ब्रिटन देशांत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली.
- सन २०१४ साली नायजेरिया देशांतील फुटबॉल खेळाच्या मैदानात झालेल्या बॉम्बस्फोटा मध्ये ४० लोकांचा मृत्यू झाला होता.
१ जून या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 1 June Birthday / Jayanti / Birth Anniversary
- इ.स. १८४२ साली ब्रिटीश कालीन भारतातील पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचा जन्मदिन.
- इ.स. १८४३ साली फिंगरप्रिंटचे जनक म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात स्कॉटिश चिकित्सक, मिशनरी आणि वैज्ञानिक हेनरी फॉल्ड्स यांचा जन्मदिन.
- इ.स. १८७२ साली प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी कवी, तसचं, इंग्रजी, संस्कृत आणि मराठी साहित्याचे गाढे अभ्यासक नारायण मुरलीधर गुप्ते यांचा जन्मदिन.
- सन १९०७ साली इंग्लिश रॉयल एअरफोर्सचे माजी वायुसेना अधिकारी व टर्बोजेट इंजिन संशोधक फ्रँक व्हिटल यांचा जन्मदिन.
- सन १९२९ साली प्रख्यात भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्या नर्गिस दत्त यांचा जन्मदिन.
- सन १९३७ साली प्रसिद्ध अमेरिकन अभिनेते आणि चित्रपट कथाकार मॉर्गन पोर्टरफिल्ड फ्रीमॅन यांचा जन्मदिन.
- सन १९३८ साली प्रसिद्ध भारतीय हिंदी भाषिक कवी व लेखक बलदेव वंशी यांचा जन्मदिन.
- सन १९७० साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेता, लेखक आणि निर्माता आर. माधवन यांचा जन्मदिन.
- सन १९७५ साली भारतीय सर्वोच्च क्रीडा सन्मान राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार तसचं, पद्मश्री पुरस्कार सन्मानित पहिल्या भारतीय ऑलिम्पिक पदक विजेता भारतीय भार्तोलन खेळाडू कर्णम मल्लेश्वरी यांचा जन्मदिन.
- सन १९८५ साली सुप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांचा जन्मदिन.
- सन १९९१ साली भारतीय युवा महिला क्रिकेटपटू राजेश्वरी गायकवाड यांचा जन्मदिन.
१ जून या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 1 June Death / Punyatithi /Smrutidin
- इ.स. १८६८ साली अमेरिकेचे १५ वे राष्ट्राध्यक्ष जेम्स बुकॅनन यांचे निधन.
- इ.स. १८७२ साली अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क हेराल्डचे संस्थापक, संपादक आणि प्रकाशक जेम्स गॉर्डन बेनेट यांचे निधन.
- सन १९३४ साली भारतीय महाराष्ट्रीयन आद्य मराठी विनोदी लेखक, नाटककार, कवी व समिक्षक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांचे निधन.
- सन १९४४ साली स्वातंत्र्य पूर्व भारतातील ब्रिटीशांच्या वसाहतीतील प्रसिद्ध चित्रकार महादेव विश्वनाथ धुरंधर यांचे निधन.
- सन १९६८ साली प्रख्यात अमेरिकन लेखिका, राजकीय कार्यकर्त्या आणि व्याख्याता तसचं, कला पद्वी मिळविणाऱ्या पहिल्या अंध-बधीर व्यक्ती हेलन अॅडम्स केलर यांचे निधन.
- सन १९८४ साली सुप्रसिद्ध भारतीय हिंदी चित्रपट अभिनेते नाना पळशीकर यांचे निधन.
- सन १९९६ साली भारतीय स्वातंत्र्य चळवळी दरम्यान भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाबरोबर आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरवात करणारे स्वातंत्र्य भारताचे सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांचे निधन.
- सन १९९८ साली प्रख्यात महाराष्ट्रीयन अन्नुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखक गो. नी. दांडेकर यांचे निधन.
- सन २००६ साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय पत्रकार आणि इंडियन एक्स्प्रेस समूहाद्वारे प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकसत्ता या मराठी दैनिकांचे संपादक माधव यशवंत गडकरी यांचे निधन.